Download App

‘ब्रम्हदेव जरी आला तरी सांगोल्यातूनच लढणार’; दीपक साळुंखेंनी वाढवलं शहाजी पाटलांचं टेन्शन

  • Written By: Last Updated:

Deepak Salunkhe : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी पक्षाच्या बुथ प्रमुखांच्या बैठकीत बोलताना यावेळी ब्रह्मदेव जरी आले, तरी मी सांगोल्यातून विधानसभा लढणार असं वक्तव्य केलं. त्यांच्या याच वक्तव्यामुळं सांगोलाचे विद्यमान आमदार शहाजी पाटी (Shahaji Patil) यांचे टेन्शन वाढलं आहे.

Bigg Boss 17: बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सनी लिओनीने ‘थर्ड पार्टी’ गाण्याचं केलं प्रमोशन ! 

सध्या राज्यात महायुतीचे सरकार सुरू आहे. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रस आणि भाजप हे तीन पक्ष सत्तेत आहेत. तीनही पक्षांकडून आपापसात चांगला संवाद असल्याचा दावा केला जातो. पण, तसं असलं तरीही तीनही पक्षांमध्ये सारं काही आलबेल नाही. कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली सुरू झाल्या. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी सांगोला तालुक्यातील पक्षाच्या बुथ प्रमुखांची बैठक घेतली.

Ajit Pawar : अमित शाहांकडे कोणाचीही तक्रार केली नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं 

या बुथ प्रमुखांच्या बैठकीत बोलतांना साळुखे म्हणाले, 2024 च्या निवडणुकीत पुढं कोणीही असू द्या, माघार घेणार नाही. आता तुम्ही काळजी करू नका, कामाला लागा. समोर कुणीही आणि कितीही असले तरी आपण सांगोल्यातून विधानसभा निवडणूक लढणारच आहोत. उमेदवारी अर्ज मागं घ्यावा, हे सांगण्यासाठी यावेळी ब्रह्मदेव जरी खाली आले, तरी आपण माघार न घेता सांगोल्यातून विधानसभा लढवू, असं साळुंखे म्हणाले.

दरम्यान, दीपक साळुंखे यांनी 2019 च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी पाटील यांना पाठिंबा दिला होता. साळुंखे यांच्या पाठिंब्यानंतर आमदार पाटील अवघ्या 768 मतांनी निवडून आले. यापूर्वी ते शेकापचे ज्येष्ठ नेते (स्व. ) गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देत होते. त्यामुळे साळुंखे यांचा पाठिंबा असलेला उमेदवार विजयी होतो, असे सांगोल्याचे राजकीय गणित आहे. आता शहाजी पाटील पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले असताना दीपक साळुंखे यांनी आमदारकी लढवणार असल्याचं वक्तव्य केल्यानं शहाजीबापूंचे टेन्शन वाढले आहे.

दरम्यान, साळुंके यांच्या वक्त्यामुळं सत्ताधारी पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच असल्याचं दिसून येत. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत सांगोल्याच्या जागेवरून पेच निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

Tags

follow us