Sharad Pawar On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी मागील निवडणुकीत शरद पवारांचा राजकीय काळ (Era) संपला, असे मोठे विधान केले होते. त्याला पवारांना सणसणीत उत्तर दिले आहे.
Maharashtra Assembly Election : मविआचं जागा वाटप कसं होणार? पवारांनी सांगितला डिटेल फॉर्म्युला
शरद पवार म्हणाले, ते असे म्हटल्यानंतर आम्ही सरकार तिथे बदललं ना? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कुणी सरकार बनवले ? आम्हीच लोकांनी बनविले. कुणाचा काळ (Era) संपला हे कळलं त्यांना आणि नुसतंच कळलं नाही. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांनी सत्ता घेतली. पण त्यांना मुख्यमंत्र्याचं (देवेंद्र फडणवीस) मंत्री व्हावं लागलं. त्यामुळे (Era) कुणाचा संपला. लोक बोलून जातात. दुर्लक्ष करायचे असते. देवेंद्र फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला. त्यांच्यात प्रतिभा जाणावत होती. आता मला त्यांची धावपळ पूर्ण वेगळी वाटते. त्यांचे वडिल गंगाधर फडणवीस हे विधानपरिषदेत होते. चांगला माणूस होता, अशी आठवण ही पवारांनी सांगितली.
बोलायची फारच खुमखुमी असेल तर आधी…; फडणवीसांनी महायुतीच्या प्रवक्यांना फटकारलं
सत्ता मिळते ना तर जातो…
मी त्यांचे दोन स्वरुप पाहिले. जे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माणसाच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिले. माझ्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण, शंकरराव चव्हाण जेव्हा मंत्री होते. त्यावेळी कॉलेजमध्ये मी शिकत होतो. नंतर शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. ते माझ्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळं मी काय कमीपणा म्हणत नाही. पण शेवटी मुख्यमंत्रिपदावर तुम्ही काम केल्याच्यानंतर तुम्हाला समजा ते पद मिळत नसेल. तर गाइड करा, मदत करा. नव्या सभासदांना एक नवीन दृष्टिकोन ठेवा. पण पण तुम्हाला अन्य पदावर जायची वेळ आली. तर सत्ता मिळते ना तर जातो.
उद्धव ठाकरेंवर काय म्हणाले ?
उद्धव ठाकरेंना शारीरिक Problems आहेत. त्यांच्यात बाकी काम करायला काही कमतरता वाटत नाही. पण वेळ कसा द्यायचा ? मुख्यमंत्र्यांना फार वेळ काढावा लागतो. लोकांना बोलायला, अधिकारांशी सगळ्या गोष्टीला. या सर्व गोष्टींना त्यांच्या प्रकृतीच्या काही अडचणीमुळे त्यांना त्या मर्यादा आहेत. आणि ते एकदम डायरेक्ट सीएम झालेत. त्याचा थोडा परिणाम होतो नाही म्हणलं तरी.