Download App

VIDEO : सर्व बंडोबा आमचेच त्यांना समजावण्यात यशस्वी होऊ; फडणवीसांना ‘सो’ टक्का विश्वास

Devendra Fadanvis Performed Lakshmi Pujan : नागपुरातील (Nagpur) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विभागीय कार्यालयात आज उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीपूजन केलंय. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य घेवून येवो अशी प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अनेक वर्ष आमचा प्रघात राहिला आहे, दरवर्षी आमच्या विभागीय कार्यालयात आम्ही लक्ष्मीपूजन करतो. आम्ही अनेक वर्षांपासून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विभागीय कार्यालयात येतो. येथे येताना आम्ही डब्बे सोबत आणतो आणि खातो, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निवडणूक पथकाची कारवाई; ९ कोटी रुपये किमतीचे डॉलर्स घेतले ताब्यात

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईला असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात खंड पडला होता, पण मला अतिशय आनंद आहे की, लक्ष्मीपुजनाच्या (Lakshmi Pujan) निमित्ताने आज पुन्हा एकदा विभागीय कार्यालयात आलो, येथे कार्यकर्ते-सहकारी या सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. गप्पा मारल्या, त्यामुळे दिवाळी अतिशय आनंदाची चालली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

विकासकामांमुळे वळसे-पाटलांना मोठं मताधिक्य मिळेल : विष्णू काका हिंगे

भारतीय जनता पक्ष हा संघटनेच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये असलेली उर्जा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येते. संघटना आणि कार्यकर्ते हे दोन्ही अत्यंत महत्वाचे आहेत. तेच आम्हाला विजयाकडे घेवून जातात. बंडखोरांवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचेच लोकं आहेत. त्यामुळे त्यांना समजावून सांगणं आमचं कर्तव्य आहे. अनेकदा रोष असतो, शेवटी एक पक्षाचं व्यापक हित लक्षात घेवून त्याठिकाणी बऱ्यापैकी मानसिकता दर्शवली आहे. त्यामुळे सगळ्यांना समजावण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय.

राज्यात सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये लक्ष्मीपूजन केलंय. यावेळी बोलताना त्यांनी बंडखोरांची समजूत काढण्यात यशस्वी ठरू असा विश्वास केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबर आहे. त्यामुळे आता कोण कोण अर्ज मागे घेणार? याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

 

follow us