निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निवडणूक पथकाची कारवाई; ९ कोटी रुपये किमतीचे डॉलर्स घेतले ताब्यात

  • Written By: Published:
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निवडणूक पथकाची कारवाई; ९ कोटी रुपये किमतीचे डॉलर्स घेतले ताब्यात

Vehicle Containing Dollars Worth Rs.9 Crores Seized : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील आर्थिक व्यवहारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून, बुधवारी संध्याकाळी कुलाबा भागातील कैवल्यधाम परिसरात निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाने ९ कोटी रुपये किमतीचे (Election) डॉलर्स असलेले वाहन ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे निवडणुकीपूर्वी आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून अनियमितता थांबवण्याच्या उपाययोजना अधिक कठोर करण्यात आल्या आहेत.

१० लाख डॉलर्सचा साठा

कैवल्यधाम परिसरात निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाने एका लॉजिस्टिक कंपनीच्या वाहनाची तपासणी केली. या वाहनात सुमारे १० लाख डॉलर्स (भारतीय मूल्य अंदाजे ९ कोटी रुपये) सापडले. प्रारंभिक तपासणीमध्ये हे पैसे एका बँकेच्या फंडाचा भाग असल्याचा दावा वाहनातील कर्मचाऱ्यांनी केला. ही रोकड विमानतळावरून एका बँकेच्या शाखेकडे वाहून नेली जात असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पाच कोटींची रक्कम जप्त, राऊतांच्या आरोपांवर शहाजी बापू कडाडले म्हणाले,माझ्याविरोधात

वाहनातील कर्मचाऱ्यांनी कस्टम विभागाची परवानगी दाखवली असली तरी, निवडणूक आयोगाच्या पथकाने परिस्थिती लक्षात घेऊन खातरजमा करण्यासाठी हे वाहन आणि त्यातील रोख रक्कम कस्टम विभागाच्या ताब्यात दिले आहे. तपास, अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी कस्टम विभागाकडून सखोल तपास केला जाणार आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारची बेकायदेशीरता आढळून येऊ नये म्हणून प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी सजग भूमिका घेतली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या सखोल तपासणीमुळे मुंबईतील मुख्य भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक तपासण्या, आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण आणि निधीवर देखरेख करण्यात येत आहे. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे अनियमित व्यवहार टाळता येतील, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube