पाच कोटींची रक्कम जप्त, राऊतांच्या आरोपांवर शहाजी बापू कडाडले म्हणाले, “माझ्याविरोधात…”

पाच कोटींची रक्कम जप्त, राऊतांच्या आरोपांवर शहाजी बापू कडाडले म्हणाले, “माझ्याविरोधात…”

Maharashtra Elections : पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर पुणे पोलिसांनी (Pune Police) पाच कोटी रुपयांची रोकड पकडली. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील एक जण काँट्रॅक्टर असल्याची माहिती मिळाली आहे. या काँट्रॅक्टरने ही रक्कम त्याची असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी रक्कम जप्त केली. तसेच पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाच्या (Election Commission) अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यानंतर कारवाईची माहिती गुप्त राखण्यात आली. पाच कोटी रुपयांची रक्कम कुणाची होती. कुठे नेण्यात येत होती याची माहिती मात्र दिली जात नव्हती. दरम्यान, जप्त करण्यात आलेली गाडी सांगोल्यातील एका व्यक्तीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Election : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, खासगी वाहनात पाच कोटी सापडले

या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती गाडी माझी, माझ्या कुटुंबाची किंवा माझ्या नजीकच्या कुणाचीही नाही. संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून त्यांना झाड दिसतंय सकाळी उठताना डोंगर दिसतोय. मला टार्गेट करण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा हेच सध्या सुरू आहे असे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

मोठी बातमी! परिवर्तन महाशक्तीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिरोळ, मिरज स्वाभिमानीसाठी  

या गाडीत असणारे कार्यकर्ते हे माझ्या संबंधातील असले तरी त्यांचे व्यवसाय आणि उद्योग वेगवेगळे आहेत. काल झालेल्या प्रकारानंतर माझा कुणाशीही संपर्क झालेला नाही. ही गाडी सांगोल्याची असल्याने लगेच मला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या पैशांशी अथवा गाडीशी माझा कोणताही संबंध नाही, असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्पष्ट केले.

पंधरा कोटींचा पहिला हप्ता : राऊत

खेड शिवापूर टोलनाक्यावर काल दोन गाड्या पकडल्या. त्यात जवळपास पंधरा कोटी रुपये होते. मी बोललो होतो की एकनाथ शिंदे आपल्या माणसांना 50-50 कोटी रुपये देणार आहेत. हा पंधरा कोटींचा पहिला हप्ता दिला होता. सांगोल्याचे गद्दार आमदार त्यांचे 15 कोटी रुपये जात होते असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube