Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. काल पुण्यातील एका सभेत बोलतांना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोठा दावा केला. कॉंग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा करून म्हणून मुस्लिम मोहल्यांमध्ये फतवे निघत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा केला.
गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला पाठवले मुलींचे 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ, पुण्यात एमएमएस स्कँडल
आम्हाला अपेक्षित जागा मिळतील
फडणवीसांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.नॅरेटिव्हने निवडणूक वातावरण तयार केले जाते. पण, नॅरेटिव्हने निवडणूक जिंकता येत नाही. निवडणुकीत विकासकामे सांगणं गरजेचं आहे. गद्दार आणि खुद्दार सांगून निवडणूक जिंकता येत नाही. लोकांना आमच्या कामाची कल्पना आहे. अबकी बार 400 ची घोषणा दिली. त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे नॅरेटिव्ह सेट करत असले तरी आम्हाला अपेक्षित जागा मिळतील, असे फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे मानसिक रुग्ण, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा; फडणवीसांचे टीकास्त्र
राज ठाकरेंनी फतव्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यांविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, फतवे काढलेच जात आहे. मला काही लोकांना व्हिडिओ दाखवले. माझ्याकडेही व्हिडिओ आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रात असं घडतंय की, मशिदीत मोठे-मोठे स्क्रीन लावून फतवा काढत कॉंग्रेसलाच मतदान करा, असं सांगितल्या जात असल्याचा दावा फडणवीसांनी केला.
फडणवीस म्हणाले, विरोधक विकासावर बोलत नाहीत. मात्र, सामान्य माणसांच्या कल्याणासाठी आपला अजेंडा काय हे सांगितलं पाहिजे. केंद्र सरकारने प्रथम ग्रामीण भागासह शहरांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले. शहरीकरण वाढत असल्यानं तो शाप वाटत आहे. शहरीकरणाकडे लक्ष्य न दिल्यानं घरे, कचरा, पाणी, सार्वजनिक वाहतूकीच्या समस्या तयार झाल्यात. त्या अनुषंगाने पुण्यात ५४ किलोमीटरची मेट्रो सुरू होत असून त्यातून दररोज १० लाख लोकांना प्रवास करता येईल, असं फडणवीस म्हणाले.
पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. पुणे रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर अडीच लाख कोटी रुपयांची नवी अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असं फडणवीस म्हणाले.