उद्धव ठाकरे मानसिक रुग्ण, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा; फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बाळासाहेबांचे नकली पूत्र अशी टीका केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मानसिक रुग्ण असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा, असा टोला फडणवीसांनी लगावला.
पक्ष कमजोर झाली की शरद पवार कॉंग्रेससोबत जातात; देवेंद्र फडणवीसांचा टोला
विरोधक विकासावर बोलतच नाहीत….
फडणवीसांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आमच्यासाठी निवडणूक जेवढी तुम्हाला अवघड दिसते, तेवढी आम्हाला अजिबात अवघड नाही. ठाकरे-पवार हे नरेटिव्ह सेट करत आहेत. महागाई, गद्दारी नॅरेटिव्ह तयार करून निवडणुका जिंकता येत नसतात. आम्ही विकासवर बोलता. पण, विरोधक एक टक्काही विकासावर बोलत नाहीत. ते फक्त गद्दार अशी टीका करत राहतात. कारण,विरोधकांना माहित आहे निवडणूक विकासावर किंवा मोदीजींवर गेली तर आपला पराभव निश्चित आहे, असं फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे पुन्हा चर्चेत, भर सभेत म्हणाले, मी आज फतवा काढतो अन् …
उद्धव ठाकरे मानसिक रुग्ण
उद्धव ठाकरेंकडून भापज आणि मोदींवर होत असलेल्या टीकेविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, काही लोक सिरीयस बोलले तर ते मनावर घ्यायचं असतं. मात्र, काही लोक नुसते बडबड करत सुटले आहेत. त्यामुळे ते सिरीयस झाले आहेत. त्यांना मदतीची आवश्यता आहे. उद्धव ठाकरेंना कोणत्यातरी मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असं मी त्यांच्या पक्षातील लोकांना सांगतो. आणि डॉक्टरांकडे नेऊन त्यांच्या मनावरचं ओझं दूर करा, असा टोला फडणवीसांनी लगावला.
केजरीवाल महान कार्य करून जेलमध्ये गेले नाहीत…
मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासह बडे नेते जेलमध्ये जाणार, असं विधान केजरीवाल यांनी केलं. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मला असं वाटतं की, केजरीवाल हे स्वत:साठी नॅरेटीव्ह तयार करतात. विरोधकांवर कारवाई होतेय, असं नॅरेटीव्ह तयार करून आपल्या बाजून वातावरण तयार करत आहेत. कोर्टाने त्यांना अटी-शर्थींसह अंतरिम जामीन दिला. मात्र, स्वातंत्र्य सेनानी सारखं ते बाहेर आले. त्यांच्यावरील कारवाई चुकीची असती तर कोर्टाने ताशेरे ओढले असतात. ते काही महान कार्य करून जेलमध्ये गेले नाहीत, असा टोला फडणवीसांनी लगावला.