Devendra Fadnavis : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) उपस्थितीत राम मंदिरात (Ram Mandir) राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येत उत्साहाचं वातावरण सुरू आहे. दरम्यान, या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून टीका टीप्पणी केली जाते. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम नाही, अशी टीका विरोधकांकडून जाते. काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर घणाघाती टीका केली. प्रभू श्रीराम हे तुमची खाजगी मालमत्ता नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला खडसावलं होतं. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं.
Prathamesh Parab: ‘डिलिव्हरी बॉय’ सिनेमात दगडू साकारणार अनोखी भूमिका
आज रायगड येथे शासन तुमच्या दारी या कार्यक्रमात बोलतांना फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, देशात २२ जानेवारीला आमच्या अस्मितेचं नवं चॅप्टर सुरू होत आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं उद्घाटन होतं आहे, हे अभिमानाची गोष्ट आहे. ज्या देशावर, ज्या प्रभू श्रीरामांवर परकीयानी अतिक्रमण केलं. त्याच ठिकाणी मंदिराचं उद्घाटन होत आहे. अयोध्येत आमचे राष्ट्रपुरूष विराजमान होत आहे. मात्र, कधी कधी आश्चर्य वाटतं की, काही लोक राम मंदिरावरूनही विवाद तयार करत आहेत. राम हे प्रायव्हट प्रॉपर्टी आहेत का, असा सवाल काही लोक करतातेहत. त्यांना सांगण आहे की, राम या राष्ट्राची प्रॉपर्टी आहे. राम जन्मभूमीचा संघर्ष सुरू होता, तेव्हा काही लोक शेपट्या घालून घरात बसले होते, तेच आम्हाला सवाल करताहेत, असा टोला त्यांनी लगावला. राम प्रत्येकाची प्रॉपर्टी आहे, असंही फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यावरून ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. श्री रामाचे मंदिर होणं ही अभिमानाची बाब आहे. ‘जय श्री राम’ हे हजारो वर्षांपासून म्हटलं जातय. तुम्ही तर आता आलात… ‘जय श्री राम, जय बजरंगबली’ म्हणत सर्व हिंदू त्यांच्यासोबत जातील असे त्यांना वाटते. मला अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. कारण रामलल्ला सर्वांचा आहे. माझी एकच विनंती आहे की राममंदिराचा उद्घाटन सोहळा हा राजकीय कार्यक्रम होऊ नये. रामल्ला ही कोणत्याही पक्षाची वैयक्तिक मालमत्ता नाही. लाखो राम भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे, अशी टीका ठाकरेंनी केली होती.