Prathamesh Parab: ‘डिलिव्हरी बॉय’ सिनेमात दगडू साकारणार अनोखी भूमिका
Prathamesh Parab Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie) या सिनेमाच्या घोषणेपासूनच चाहत्यांना या सिनेमाबद्दल (Marathi Movie) चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर (social media) झळकले आणि आता चाहत्यांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला सिनेमात दिसणार आहे.
View this post on Instagram
आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत, याचे उत्तर मात्र चाहत्यांना लवकरच मिळणार आहे. या सिनेमात प्रथमेश आणि पृथ्वीक सोबत अंकिता लांडेही पाटीलही मुख्य भूमिकेत आहे. ‘डिलिव्हरी बॉय’मधून प्रथमेश परब एका अनोख्या लूकमध्ये चाहत्यांसमोर मनोरंजन करणार आहे.
हा चित्रपट सरोगसीवर भाष्य करणारा आहे, हे टीझरवरून पाहायला मिळत आहे. आता हा नाद खुळा भाऊ आणि त्याचा जोडीदार गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करतो की आणखी काही अडचणी निर्माण करतो, हे बघताना चाहत्यांना नक्कीच धमाल येणार आहे.
सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. डेव्हिड नादर निर्माते असून फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.
Merry Christmas: ‘मेरी ख्रिसमस’ च्या रीलीजपूर्वी विजय सेतुपतीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक
याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” एका संवेदनशील विषयवार या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयांचे गांभीर्य आम्ही तितकेच जपले आहे. विनोदाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही नात्यांची गोष्ट आहे. जी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावी अशी आहे. आपल्या समाजात हा विषय तितकासा उघडपणे, सहजपणे बोलला जात नाही. त्यामुळे हा विषय घराघरात पोहोचावा, त्याचे महत्व पटावे, याकरता आम्ही हा चित्रपट अगदी मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.”
तर निर्माते डेव्हिड नादर म्हणतात, ” एक धमाल चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. प्रेक्षकांना आपल्या आसपासचे विषय पडद्यावर बघायला जास्त आवडतात. या चित्रपटात मनोरंजन आहे, विनोद आहेत, समाज प्रबोधन आहे आणि याच गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावणाऱ्या आहेत. चित्रपटाचा विषय जरा वेगळा आहे. ‘डिलिव्हरी बॉय’चे सादरीकरण वेगळे आहे आणि माझ्या मते हीच या चित्रपटाची खासियत आहे.”