Download App

लोकसभेला आमची कामगिरी वाईट, भाजप कमकुवत…; देवेंद्र फडणवीसांची कबुली

आमची लढाई जेव्हा आमच्याच आधीच्या रेकॉर्डशी झाली, ते पाहता आमची ही नक्कीच वाईट कामगिरी राहीली. - देवेंद्र फडणवीस

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) भाजपला (BJP) महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला. महाराष्ट्रातील भाजपची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. भाजपला महाराष्ट्रात केवळ 9 जागा जिंकण्यात यश मिळालं. त्यामुळं भाजप कमकुमवत पक्ष झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.

Game Changer: राम चरणचं चाहत्यांना मोठं गिफ्ट! कियारा अडवाणीसोबत ‘गेम चेंजर’ मधील दुसरं गाणं भेटीला 

देवेंद्र फडणवीस इंडिया टुडेच्या मुंबई कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमकुवत पडला का? असा सवाल त्यांना विचारला असता त्यांना हा दावा पेटाळून लागवला. ते म्हणाले, भाजपला कमकुवत म्हणणे हे चुकीचं विश्लेषण आहे. ज्यानं हे विश्लेषण केलं त्यांना पुन्हा नव्याने विश्लेषण करायला शिकवावं लागेल. भाजपने 9 जागा जिंकल्या. भाजपचा 12 जागांवर 3 टक्क्यांपेक्षा कमी फरकाने पराभव झाला आहे. एकूण विश्लेषणात आम्ही पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. आम्हाला सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे भाजप हा सर्वात कमकुवत पक्ष आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी होणार घोषणा, जयंत पाटलांनी दिले संकेत 

ते म्हणाले, मी स्पष्टपण सांगतो की, जे नॅरेटिव्ह विरोधकांनी परवलं, जो अपप्रचार केला जात होता, ज्या भरवश्यावर मविआने जागा जिंकल्या, आज त्याबद्दल लोकांना हे समजून चुकलं की, तो अपप्रचारच होता. मी आत्मविश्वासाने सांगेल की, भाजप आणि महायुती पूर्ण बहुतमताने विधानसभा निवडणूक जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा लढवल्या, त्या प्रमाणात जागा जिंकून आणण्यात अर्थात स्ट्राइक रेटमध्ये भाजप पिछाडीवर गेला याविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, स्ट्राईक रेटला काही महत्व नाही. आकडे तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही सांगू शकता. कुणी व्यक्ती एका बॉलमध्ये चार धावा काढून बाद झाला तर त्याचा स्ट्राईक रेट जास्तच राहणार आहे. स्टाईक रेट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे. दुसरा बिचारा 100 धावा करूनही स्ट्राईकरेटमध्ये 80 वरच राहू शकतो. महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष भाजप होता, भाजप आहे आणि भाजपच राहील, असं फडणवीस म्हणाले.

भाजपने आजवर राज्यात लोकसभेला दोन आकडी जागा जिंकल्या, मात्र, 2024 च्या लोकसभेत भाजपच्या जागा एक आकड्यावर आल्या. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आमची लढाई जेव्हा आमच्याच आधीच्या रेकॉर्डशी झाली, ते पाहता आमची ही नक्कीच वाईट कामगिरी राहीली. पण आमच्या जागा आम्ही 6 हजार, 4 हजार, 16 हजारांच्या फरकाने हरलो. जिंकलेल्या जागांमध्ये एक जागा सोडली तर इतर जागा आम्ही दीड ते दोन लाखांच्या फरकाने जिंकल्या आहेत, असं फडणवीस म्हणाले.

follow us