Download App

‘पुरावे असतील, तरच धनंजय मुंडेंवर कारवाई होईल…’ देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली हाताळलं आहे. अनेक लोक राजकारणी हेतुने अनेक गोष्टी करतात. सीआयडीने अतिशय चांगला तपास केलाय. वेळेत तपास पूर्ण केलाय. योग्य प्रकारे वीण तयार केलीय. कोणताही विलंब न करता चार्जशीट दाखल केलीय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) म्हणाले की, मुळात या संपूर्ण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा थेट संबंध (Santosh Deshmukh Murder) आलेला नाही. तरीदेखील त्यांचा राजीनामा घेतला कारण या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मुंडेंचा उजवा हात होता.

नैतिकतेच्या आधारावर हा निर्णय घेतला. त्या संपूर्ण घटनेत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावा नाही. या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राईट हॅंडने काम केलंय, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. पुरावे असतील, तरच धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उगाच हवेत तीर मारायचे अन् सनसनी निर्माण करायची, याला अर्थ नाही असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

New Zealand VS Pakistan: पाक संघ पुन्हा तोंडावर आपटला ! टी-20 मालिका न्यूझीलंडने सहज जिंकली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी एका दिवसात जॅकेट बदलतो. आमदाराचा मुख्यमंत्री झालो, तर एका दिवसात मुख्यमंत्र्‍याच्या रोलमध्ये शिरलो. तर विरोधी पक्षनेता झालो अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांना झोपूच दिलं नव्हतं. हा बदल माझ्यासाठी नवीन आणि कठीण नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.

लाडकी बहीण योजनेला वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. या योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील महिलांना प्रतिष्ठा मिळाली. पुढील तीन वर्ष आम्हाला थोडी ओढाताण करावी लागणार आहे, परंतु त्यानंतर स्थिरता येईल. कोणत्याच योजना आम्ही बंद करणार नाही, तर गुंतवणूक वाढवली जाणार आहे, असं देखील मुख्यमंत्र्‍यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं आहे.

जयंत पाटील मोठ्या कासाची पण…दूध चोरणारी म्हैस, पडळकरांची खोचक टीका

नागपूर प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मूठभर लोक अशी परिस्थिती निर्माण करतात. काही तासांत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु जे काही घडलं ते योग्य नाही. दुपारनंतर काही युट्युबर्सने पोस्ट टाकल्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, अन् तोडफोड करण्यात आली. याठिकाणी सगळ्यात जास्त हल्ला पोलिसांवर झाला होता. आता नागपूर शांत आहे, परंतु ज्यांनी स्वास्थ बिघडवलं त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर कडक शासन होईल, असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

 

follow us