‘2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो’; फडणवीसांचा ठाकरेंना मिश्किल टोला

Maharashtra Hasyaresha Book; ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मिश्किल टोला लगावला.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Maharashtra Hasyaresha Book

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Maharashtra Hasyaresha Book

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Maharashtra Hasyaresha Book: ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी फडणवीसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मिश्किल टिप्पणी करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा कुणाला मिश्किल सवाल ?

“सगळेच डाव्या बाजूला गेले, त्यामुळे मी जाणीवपूर्वक उजवीकडे आलो,” असं म्हणत फडणवीसांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी उद्धव ठाकरेंबाबतही टिप्पणी केली. “आशिषजी म्हणाले की, राज ठाकरेंनी फोन केला की फडणवीस येतात. पण 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा फोन केला, तेव्हा तेव्हा मी गेलो. मात्र, 2019 नंतर त्यांनी मला बोलावलंच नाही. मी वाटच पाहत राहिलो,” असं फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमात शेवटी भाषण करण्याचा फायदा सांगतानाही त्यांनी राज ठाकरेंना मिश्किल टोला लगावला. “शेवटी भाषण करण्याचा फायदा असा की, मी केलेल्या भाषणावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आज तरी मी काही बोललो, तर त्यावर प्रतिषटकार होणार नाही,” असं ते म्हणाले.

मोठी बातमी : बारामती विमानतळासाठी 65 कोटींचा निधी मंजूर; अजित पवारांच्या अपघातानंतर निर्णय

प्रशांत कुलकर्णी यांनी व्यंगचित्रांचं संकलन पुस्तकाच्या रूपात आणल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं. व्यंगचित्र ही शब्दांचा वापर न करता प्रभावीपणे फटकारे देणारी कला असल्याचं ते म्हणाले. “आम्हीही या व्यंगचित्रांचे विषय असतो. आमच्यावर व्यंगचित्रं काढली जातात; पण ती पाहून दुःख होत नाही, उलट आनंद होतो,” असं त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांच्याकडे एकदा स्वतःचं व्यंगचित्र काढताना नाक आणि कान मोठे दाखवण्याची, मात्र पोट मोठं न दाखवण्याची विनंती केल्याचा किस्साही फडणवीसांनी सांगितला. राज ठाकरेंनी ही विनंती पाळली; मात्र इतर व्यंगचित्रकार त्यांच्या पोटावरच लक्ष केंद्रित करतात, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. अलीकडे वजन कमी केल्यामुळे आता व्यंगचित्रकार आपल्याला सोडतील, असंही ते म्हणाले.

दिवाळीच्या फराळावर FDA ची नजर! फराळ विक्रेत्यांची तपासणी, सुटे मसाले व खाद्यतेलावरही लक्ष

व्यंगचित्रांच्या ताकदीचं उदाहरण देताना फडणवीसांनी नेपोलियन आणि ब्रिटिश पंतप्रधानांचं चित्र सांगितलं. एका व्यंगचित्रकाराने नेपोलियन आणि ब्रिटिश पंतप्रधान एकत्र बसलेले असल्याचं चित्र काढलं होतं. दोघांच्या मध्ये पृथ्वीच्या आकाराचा केक ठेवला होता आणि ते त्याचे तुकडे करत असल्याचं दाखवलं होतं. हे चित्र पाहून नेपोलियन म्हणाला की, “युरोपच्या सैन्यालाही माझं जेवढं नुकसान आणि बदनामी करता आली नाही, तेवढं नुकसान या व्यंगचित्राने केलं.” व्यंगचित्रामध्ये किती ताकद असते, हे सांगण्यासाठी फडणवीसांनी हे उदाहरण दिलं. मराठी व्यंगचित्रकारांनी ही प्रभावी परंपरा जपल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Exit mobile version