उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडूनीही उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना ट्विटर पोस्ट शेअर करीत ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. यावेळी ठाकरेंनी नागपुरातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांचा ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’ असा उल्लेख केला. त्यावरुन आता देवेंद्र फडणवीसांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. या टीकेवरुन उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणीसांमध्ये रणकंदनच सुरु असल्याचं दिसून येत आहे.
‘कलंकीचा काविळ’ !
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान… pic.twitter.com/efd6rdG8d2— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 10, 2023
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्या गुरांचं शेणसुद्धा खाल्लं होतं. त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. टॉयलेटमधील पेपर खालले, शेण खाल्लं, असं ठाकरे त्यामध्ये म्हणत आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा अहवाल समोर
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द कशी सुरु झाली ते मी सांगतो, त्यांनी स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करुन यांनी पुलोद काढली. का? तर मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाकी गेलं खड्ड्यात. त्यानंतर त्यांनी राजीव गांधींसोबत द्रोह केला, अशी टीका उद्धव ठाकरे या व्हिडिओत करत आहेत.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक. सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक”, अशी टीका फडणवीस यांनी केली.
भाजप नेत्याच्या नावाने फेक अकाऊंट, महिलांना विचारायचा भेटू शकता का? पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का? असे विचारणे, याला म्हणतात कलंक”, असंही ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
“कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की, इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी” अशी खोचक टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.