भाजप नेत्याच्या नावाने फेक अकाऊंट, महिलांना विचारायचा भेटू शकता का? पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भाजप नेत्याच्या नावाने फेक अकाऊंट, महिलांना विचारायचा भेटू शकता का? पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलांना मेसेज करणाऱ्या एका तरुणाला कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. चंदन सुभाष शिर्सेकर (Chandan Subhash Shirsekar) असं या अटक केलेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. ( MLA Ganpat Gaikwad fake facebook account a young man arrested)

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांच्या आवाजाऐवजी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण ताजे असतांनाच आता त्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या बनावट अकाऊंटवरून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात होत्या. समोरआलेल्या माहितीनुसार, या अकाऊंटवरून आरोपी महिलांना Hi, Hello? तुम्ही भेटू शकता का, असा मेसेज करायचा. वारंवार असे मेसेज येत असल्यानं काही महिलांनी थेट आमदार गायकवाड यांना गाठून ‘तुम्ही मला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे का?’ अशी विचारणा केली. महिलांनकडून अशी विचारणा झाल्यांनं आमदार चकीत झाले. आपण कुणालाही रिक्वेस्ट पाठवली नसतांना ही विचारणा कशी काय झाली? असा प्रश्न गायकवाड यांना पडला.

उद्धव ठाकरेंनी भावना गवळी आणि संजय राठोडांना धुतलं; काय शिंपडलं की तुम्ही स्वच्छ दिसू लागले? 

दरम्यान, कोणीतरी आपल्या नावाने बनावट खाते तयार करून हे कृत्य करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी उल्हास जाधव, हरिदास बोचरे यांनी चंदन सुभाष शिर्सेकर या २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

चंदन हा ओला गाडी चालक आहे. तो कोळसेवाडी परिसरातील रहिवासी आहे. चंदनने फक्त दहावीचे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे पकडले जाऊ नये म्हणून तो इतर लोकांचे वायफाय आणि हॉटस्पॉट वापरत होता. मात्र, या प्रकरणातील सूत्रधाराला लवकर अटक करावी, अशी मागणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

चंदनला रविवारी दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. चंदनने हा प्रकार स्वतः केला की, कोणाच्या सांगण्यावरून केला? असे मेसेज पाठवून काही आर्थिक फायदा घेतला का? याचा तपास पोलिस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube