Download App

‘फडणवीसांचा रात्री तीन वाजता फोन’; खुद्द मनोज जरांगेंची कबुली

Manoj Jarange : राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाप्रकरणी मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation) पोलिसांकडून कारवाई होत आहे. या कारवाईनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आधीच्या आंदोलनाबाबतचेही गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं. मात्र, तरीही कारवाया सुरु होत्या. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनीच रात्री तीन वाजता फओन करुन गुन्हे मागे घेतो असल्याचं आश्वासन असल्याची कबुली मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांन दिली आहे. बीड दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दारूण पराभव समोर दिसत असल्याने बाळराजे गायब; भाजपचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

मनोज जरांगे म्हणाले, मला देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला होता. गुन्हे मागे घेतो असंही सांगितलं. त्यांना बोलायचं नव्हतं पण तरीही ते बोलले. एक वाजता आधी फोन केला, तो मी घेतला नाही. त्यानंतर पहाटे तीन वाजता फोन केला. त्यांचे लोक येऊन बसले. मला सांगितलं की इथून पुढे काही होणार नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच कारवाया सुरुच आहेत. याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून द्वेष दाखवून मराठे संपवायचे असंच दिसतं आहे. एकीकडे सांगायचं आता काही होणार नाही. दुसरीकडून कारवाया सुरुच असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेस अन् कर्ली हेअर; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत, पाहा फोटो

आम्हाला जाणीवपूर्वक अडचणींत आणण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. जाणीवपूर्वक मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत हे केलं गेलं. मात्र न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. खरंतर सरकारने ही भूमिका घ्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. ज्या जनतेच्या जिवावर मोठे झाले तेच नेते आमच्यावर अन्याय करतं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी आहे. आंदोलन, कार्यक्रम चार महिन्यांपूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल केले जात आहेत. जेसीबी लावले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं सुरु केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली आहे. मी फुटणार नाही, हटणार नसल्याचाही इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे.

दरम्यान, ओबीसी बांधव आणि बारा बलुतेदार समाजाने आता सावध होणं गरजेचं आहे, कारण एवढ्या मोठ्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा होऊ शकतो, मराठा समाजाविषयीचा द्वेष हा भयानक असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.

follow us