Dhairyasheel Mohite Patil On Ram Satpute: धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार गटात आज प्रवेश केलाय. धैर्यशील मोहिते यांनी पहिल्याच भाषणात भाजपचे (BJP) लोकसभा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर हल्लाबोल केला. धैर्यशील मोहिते यांनी माळशीरसचे आमदार राम सातपुतेंवर असलेल्या राजकीय राग सगळ्यांसमोरच जाहीरपणे सांगितला.
एकदा चुक केली आता पुन्हा करु नका… लंकेंना टोला लगावत विखेंचे पारनेरकरांना आवाहन
आमदाराने मांडव्यातील एका भाषणात 70 ते 75 वर्षांत विकास झाला नाही. तो विकास मी आता करून दाखविला आहे, असे तो आमदार म्हणतो. त्याचे पार्सल आता बीडला पाठवायचे आहेत. दादांच्या (विजयसिंह मोहिते) सांगण्यावरून एका रात्रीत तुला आमदार केला. तुझं पार्सल एका रात्रीत बीडला पाठवायची आमच्यात धमक आहे, असे सांगून थेट धैर्यशील मोहिते यांनी पहिला वार राम सातपुतेंवर केला आहे.
तर खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर टीका करताना धैर्यशील मोहिते म्हणाले, माळशिरस तालुक्यात त्याला माणसे दिली. ज्यांनी मते टाकली त्याला सोडून ज्यांनी मते दिले नाहीत. त्यांना फोन करून हा आपल्या गाडीत घेऊन आता फिरत आहे.
तिकीटासाठी गोडसेंची धावाधाव; भुजबळ म्हणतात, जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत…
आता खासदार सांगत सुटलाय की वर्षाला एक लाख कोटी रुपये आणले आहेत. तासाला हजार कोटी आणल्याचे सांगत सुटला आहे. हे कुठे आणले आहे ते तुम्हाला दिसले का ? या खासदाराला कामे करायची माहिती नाहीत. तीन पिढ्यापासून जनता आमच्यावर प्रेम करतो. त्यामुळे जनतेसाठी आजपासून हातात तुतारी घेत आहे.
प्रणिती शिंदेंना होणार मदत
धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात दाखल झाल्याने सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघाचे राजकीय गणिते आता बदलली आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील व रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार आहेत. राम सातपुते यांच्यावरील राग पाहता मोहिते कुटुंब हे प्रणिती शिंदे यांना मोठी मदत करतील, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राम सातपुतेंसाठी लढत अवघड झाल्याची चर्चा आहे.