Lok Sabha Election: भाजपला मोठा धक्का, अखेर धैर्यशील मोहिते यांनी तुतारी फुंकली !

Lok Sabha Election: भाजपला मोठा धक्का, अखेर धैर्यशील मोहिते यांनी तुतारी फुंकली !

Dhairyasheel Mohite-Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात आज धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यांनी प्रवेश केला आहे. ते तुतारी चिन्हावर माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे. (Lok Sabha Elections) भाजपला (BJP) हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासुन माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) राजकीय हालचालींना वेग आला होता.

आज त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. माहितीनुसार, धैर्यशील पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील, संजीवराजे निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर शरद पवार गटाला साथ देणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले होते. उमेदवारी नाकारल्याने त्यांनी 12 एप्रिलला भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर गुरुवारी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने माढा लोकसभा मतदारसंघातून ते रणजितसिंह निंबाळकरांविरोधात तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

अकलूजमध्ये पवारांचे विजयसिंह मोहितेंबरोबर खलबतं
तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील व इतर नेते अकलूजमध्ये होते. त्यांनी विजयसिंह मोहिते यांची भेट घेतली. त्यानंतर मोहिते कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच धैर्यशील मोहिते यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे.

यावर शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते हे निवडणूक लढविणार आहेत. ते 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच माढा, सोलापूरमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube