Download App

Video : सांगता सभेत वळसे पाटलांनी पवारांपासून निकमांपर्यत सर्वांनाच ठोकलं

ईडी, सीबीआयची (CBI) अशी कुठलीही नोटीस मला आलेली दाखवा. नोटीस आल्याचे सिद्ध केल्यास मी उमेदवारी मागे घेतो - वळसे पाटील

  • Written By: Last Updated:

Dilip Walse Patil : आज विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटी यांची  मंचर येथे सांगता सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांना थेट चॅलेज दिलं. ईडी, सीबीआयची (CBI) अशी कुठलीही नोटीस मला आलेली दाखवा. नोटीस आल्याचे सिद्ध केल्यास मी उमेदवारी मागे घेतो, असं थेट चॅलेज दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिलं.

मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध झाल्याने मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले ; दिलीप वळसे पाटील 

मंचर येथे दिलीप वळसे पाटील यांच्या सभेची सांगता झाली. यावेळी बोलतांना वळसे पाटील म्हणाले की, जेव्हापासून आम्ही सत्तेत जाण्याची भूमिका घेतली तेव्हापासून या मतदारसंघात एक प्रश्न विचारला जातो की, वळसे पाटलांनी पवार साहेबांना का सोडलं? काही लोक म्हणतात, त्यांना अटक होणार होती, त्यांना ईडीची, सीबीआयची नोटीस आली होती म्हणून मी पक्ष सोडला. मात्र, मी यापूर्वीही सांगितलं आहे की, आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात मला ईडीची, सीबीआयची कुठलीही नोटीस आलेली नाही. मला नाोटीस आली असं कुणाला वाटत असेल तर त्याचा पुरावा असेल तर मला पाठवा. उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागे घेतो.

दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला मोठं केलंय, तालुक्याचा विकास केलाय ; विष्णू काका हिंगे 

पुढं ते म्हणाले, उगाच खोटंनाटं काहीतरी बोलायचं, लोकांना भूलवून आपल इप्सित साधायचं हे विरोधकांचा धोरण आहे, विरोधक केवळ अफवा पिकवण्यात माहीर आहेत, अशी टीका त्यांनी केली.

आंबेगावचा वाळवंट करण्याची काहींची भूमिका…

मी जनतेच्या पाण्यासाठी भाजप सोबत सत्तेत गेलेलो आहे. मी हा निर्णय का घेतला तर मग बघा हा व्हिडीओ असं म्हणत वळसे पाटलांनी आपल्या सभेत निलेश लंके, रोहित पवार यांचे व्हिडिओ दाखवून  आपल्या तालुक्याचा वाळवंट करून नगर जिल्ह्यात पाणी नेण्याची काहींची भूमिका आहे, असं ते म्हणाले.  यावेळी उपस्थितांना पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणाही केल्या.

 

ते म्हणाले, नगर जिल्ह्याला पाणी न्यायला आपला विरोध नाही. मी नगर जिल्ह्याचा 10 वर्ष पालकमंत्री होती, मात्र तेव्हा कधी पाण्याच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला नाही. त्यांना जेवढं पाणी पाहिजे होतं, तेवढं पाणी आपण देतच आलोय. मात्र, आता काही जण बोगद्याचं मुद्दा उपस्थित करून राजकारण करत आहे, अशी टीका वळसे पाटलांनी केली.

तोंड दाखवालया जागा राहणार नाही

यावेळी त्यांनी देवदत्त निकम यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, विरोधी उमेदवार म्हणतो, माझी नार्को टेस्ट करा, बिनधास्त करा. पण माझी ही करा अन तुमचीही करा. माझ्या नार्को टेस्टमध्ये काय बाहेर पडेल याची मला कल्पना आहे, पण तुम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा हल्लाबोल वळसे पाटलांनी केली.

विरोधक म्हणाले महिला असुरक्षित आहेत, मग करू न आपण सगळी चौकशी. बदलापूर पासून ते नागापूर पर्यंत सगळी चौकशी करूयात, असंही वळसे पाटील म्हणाले.

 

 

follow us