Download App

‘तुम्हीच माझ्या जागेवर येऊन बसा अन् ठरवा’; सरन्यायाधीश पवार-ठाकरेंच्या वकिलांवर उखडले…

अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाच्या वकीलांवर सरन्यायाधीश संतापल्याचे दिसून आले आहेत.

Mla Disqualification Shivsen & Ncp : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) आमदारांच्या अपात्र प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या वकीलांनी शिवसेनेबाबत लवकरात लवकर निर्णय देण्याची विनंती केलीयं. मात्र, सरन्यायाधीश वकीलावर चिडल्याचं दिसून आले. तुम्ही आमच्या जागेवर येऊन बसा अऩ् ठरवा, आमच्यावर लोड असतो, आम्ही पुढील तारीख देत असल्याचं म्हणत सरन्यायाधीश वकीलांवर चिडले आहेत. सुनावणीनंतर वकील सिद्धार्थ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधलायं.

मोठी बातमी! लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत पुन्हा बिघडली, अपोलो रुग्णालयात दाखल

दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणावर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान, तारीख पे तारीख सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयात आज यावर सुनावणी पार पडलीयं. यावेळी अनुक्रमे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर महत्वपूर्ण टिप्पणी केलीयं. शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरण जुनं असून या प्रकरणात शिंदे गटाकडून उत्तरंही सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकीलांनी संकलन करुन सादर करण्याबाबत सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. तर पुढील तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये या प्रकरणावर युक्तिवाद होणार असून ऑक्टोंबरमध्ये म्हणजेच विधानसभा निवडणुकीआधी निकाल लागण्याची शक्यता असल्याचं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

सरन्यायाधीश का चिडले?
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर सुनावणी सुरु असताना ठाकरे गटाचे वकीलांनी लवकरात लवकर देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना केली होती. वकीलांनी विनंती करताच सरन्यायाधीश तात्परते संतापल्याचे दिसून आले. तुम्ही आमच्या जागेवर येऊन बसा त्यानंतर ठरवा, आमच्यावर लोड असतो, आम्ही पुढील तारीख देऊ, या शब्दांत सरन्यायाधीश वकीलांवर चिडले आहेत.

मोठी बातमी! बांग्लादेशातील हिंसाचाराच्या भारतालाही झळा; ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू

राष्ट्रवादीच्या आमदारांना तीन आठवड्यांची मुदत…
राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांप्रकरणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी याचिका दाखल केलीयं. यावरही सरन्यायाधीशांनी टिप्पणी केलीयं. सरन्यायाधीश म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 41 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाला उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात येत आहे. तीन आठवड्यानंतर अजित पवार गटाकडून उत्तर आल्यास सुनावणी सुरु होणार असल्याचं सरन्यायाधीशांकडून सांगण्यात आलंय.

अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकालाविरोधात शिंदे गटासह अजित पवार गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीयं. या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होणार असल्याचं सरन्यायाधीशांनी आजच्या सुनावणीमध्ये स्पष्ट केलं असल्याचं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र आमदार प्रकरणाचा सर्वोच्च निकाल हा आगामी विधानसभा निवडणुकीआधीच लागणार असल्याचे संकेतच सरन्यायाधीशांनी दिले असल्याचं वकीलांनी स्पष्ट केलं आहे.

follow us