Eknath Khadse Vs Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामध्ये विधानपरिषदेमध्ये जोरदार हमरी-तुमरी झाली. त्यामुळे सभापतींचा सभागृह स्थगित करण्यात आले. एकनाथ खडसे यांनी कापसाचा भाव आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वाळूतस्करी यावर मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून गिरीश महाजन (Girish Mahajan) हे संतप्त होऊन बोलू लागले. महाजन यांनी खडसे यांच्या वैयक्तिक गोष्टी सभागृहात उकरून काढल्या.
लाडकी बहिण योजनेवर ४६ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे पैसे सिंचनावर खर्च केले असते तर शेती समृद्ध झाली असते. कापसाला, सोयाबीनला भाव नाही. अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. कापसाला भाव देण्यासाठी आताचा एक मंत्री जळगाव जिल्ह्यात आंदोलन करत होता. दहा दिवस उपोषणाला बसले होते, दहा वर्षांपूर्वी. आता दहा हजार, बारा हजार रुपये का भाव दिला नाही. चार वर्षांपूर्वी दहा हजार रुपये भाव होता. आता सहा हजार भाव का झाला आहे ? सोयाबीनचे भाव आहे. सर्वत्र खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे. साडेसहा हजार रुपये भाव मिळू शकत नाही. खरेदी केंद्र उभारले जात नाही. राज्य सरकारची भूमिका काय ? अशी विचारणा खडसे यांनी केले. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे मध्येच उठले आणि म्हणाले रेतीचे तस्कर कोण आहेत? जिल्ह्यामध्ये सदरे नावाच्या पीआयने का आत्महत्या केली ?
सर्वात मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ दिवशी होणार भारत – पाकिस्तान सामना
त्यावेळी कोण खंडणी मागत होते. त्याच्या पत्नीला पैसे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांना अमिष दाखविण्यात आले. त्यामुळे त्यांचे नाव, त्यांची चिठ्ठी दाबण्यात आली. कोणी केले हे ? रेतीचा स्मॅगलर आमच्याकडे कोण आहे. तिकडे हे धंदे करायचे आणि इकडे बोलत बसायचे हे धंदे कोण करत आहे. सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. दफ्तरी नोंद आहे. कुणाच्या ट्रका चालतात ? कोण धंदे करतात ? रेतीचे स्मॅगलर कोण आहेत. सदरे नावाचा पीआय त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या मागून मागून त्याने आत्महत्या करून घेतली. त्यांनी काय धंदे केले आहे. बांगड्या काय ? तोंड काळं केलं ना ? भोगत आहात ना ? असे शब्द महाजन यांनी खडसे यांना उद्द्शेन विचारले. वाळूमाफिया हे राज्यभर आहेत. जळगाव जिल्ह्यात काल वाळूमाफियाचा प्रकार घडला आहे. सरकार तुमचे आहे. वाळू माफियांवर का कारवाई केली नाही? का बांगड्या घातल्या आहेत का ? कलेक्टर का कारवाई करत नाही ? कापसाला का भाव देत नाही ? असे प्रत्युत्तर खडसे यांनी दिले.
सर्वात मोठी अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ‘या’ दिवशी होणार भारत – पाकिस्तान सामना
त्यावर गिरीश महाजन म्हणाले, जळगावमध्ये वाळूमाफिया कोण आहे. सदरे नावाच्या पीआयने का आत्महत्या केली? चाललंय काय ? रॉयल्टीमध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटीमध्ये चोरी करायच्या ? घरचे लोक तीन-तीन वर्षे जेलमध्ये बसले होते. आता छाती बडवून बडबड करत आहात, अहो चोऱ्या कुणी केल्या आहेत. तुमच्या घरात काय झालं ? तुमच्या पोराला का मारलं ? का तोंड काळं केलं, मी तर म्हणतो नार्को टेस्ट करा.
त्यावर खडसे म्हणाले, माझे भाषण शांतेत करत होतं. कुणाच्या बुडाला आग लागण्याचे कारणच नव्हते. कापसाला भाव नाही, सरकारमध्ये विरोधी पक्षनेते होते. मीच तुमचे उपोषण सोडले आहे. मुंडेंसाहेबांना बोलवून. माझे उपोषण सोडवा, असे म्हणत होता. तुम्हाला एेवढे आरोप करायचे आहे. सरकार तुमचे आहे. सीबीआयकडून चौकशी करा. नाथाभाऊ संबंध असेल तर बाहेर येईल. खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे. इडीसारखे गुन्हा दाखल करायचे आहे. तुमच्या काय आरत्या ओवाळायच्या का ? नाथाभाऊंचा काय संबंध होता, त्या गोष्टी आहे. वाळूमाफिया असेल तर चौकशी करा, तुम्हाला कोणी रोखले ? माझी मागणी आहे, वाळूमाफियांवर गुन्हा दाखल केला. मोक्का लावा, एमपीडीएनुसार कारवाई करा. मागणी करत आहे. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असताना सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहाची कामकाज स्थगित केले.