‘त्या’ अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

  • Written By: Published:
‘त्या’ अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

Nana Patole : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) समाविष्ट झालेल्या विविध संघटना राज्याच्या व लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या व अर्बन नक्षलवाद माजवणाऱ्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील केला आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या संघटनेच्या प्रमुखांची यादी द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कामे करत असून राज्यातील गोरगरिब व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत. राज्यात व देशात लोकशाही भक्कम व्हावी यासाठी अशा संघटना कार्यरत आहेत. अशा सामाजिक संघटनांसह विचारवंत, ज्येष्ठ नागरिकही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. अशा संघटनांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादी संबोधणे अत्यंत चुकीचे आहे.

भारत जोडो यात्रेला संघटनांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली त्या विविध संघटनांचे दाखले देत त्या संघटना नक्षलवादी आहेत असे संबोधले त्या संघटना व संघटना प्रमुखांची यादी आम्हाला द्यावी अशी मागणी पटोले यांनी या पत्रात केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

19 डिसेंबर रोजी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव झाला असल्याचा आरोप केला होता. राज्यात 48 संघटना आहेत. त्यातील शहरी भागात 20 संघटना कार्यरत आहेत.  डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 72 संघटनांची यादी लोकसभेत जाहीर करण्यात आली होती.  त्यातील 7 संघटना तुमच्या भारत जोडो अभियानातील आहेत. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

जबरदस्त! अवघ्या 1 लाखात घरी आणा Maruti Baleno CNG, जाणून घ्या तपशील

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्र एटीएसने केंद्राला जी माहिती पाठवली, त्यातील 40 पैकी 13 संघटना या भारत जोडो आंदोलनात काम करत आहेत. माझ्या तुमच्या देशभक्तीवर प्रश्न चिन्ह नाही. पण निवडणूक जिंकण्यासाठी कुणाचा खांदा वापरला जातोय, हे पाहा. हात जोडून सांगतोय देशविरोधी कृत्यासाठी तुमचा खांदा देउ नका. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube