तेव्हा नाही राष्ट्रपती राजवट आठवली; मुख्यमंत्र्यांकडून महाविकास आघाडीचा समाचार

Eknath Shinde on MVA : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. आमदार गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. निखिळ वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकार बरखास्त करून राज्यात […]

आषाढीवारीत सहभागी दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

Eknath Shinde on MVA : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. आमदार गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. निखिळ वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मनोज जरांगे शब्दावर ठाम! उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय तपासणीला नकार 

आज नागपूरच्या सभेत बोलतांना बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीकडून होत असलेल्या टीकेवर बोलतांना शिंदे म्हणाले की, राष्ट्रपती राजवट अशीच लागते का? कधी निवडणुका घ्या, कधी हे करा, असा नुसता थयथयाट सुरू आहे. सत्ता नसल्यान हा थयथयाट सुरू आहे…. सरकार कोणत्याही घटनेचे किंवा गुन्ह्याचे समर्थन करणारं नाही. कुठल्याही गुन्हेगाराला सरकार पाठीशी घालणार नाही. पण, तुमच्या सरकारचे गृहमंत्री तुरुंगात गेले होते, तेव्हा तुम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी का केली नाही, असा सवालही शिंदेंनी केली.

‘योगींना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची सडकून टीका 

यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. आज काही लोक रामाच्या अस्तित्वावर शंका घेतात. पण, जो राम का नही, वो किसी काम का नही. ज्याने रामावर श्रध्दा दाखवली नाही, त्याला घरी बसवलं असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला आणि माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, अशी टीका करता. एखादं लहान मुल जसं करतं, तशी तशी कृती सध्या सुरू आहे. लहान मुलांसारखी टीका ठाकरे करतात. बाळासाहेब चोरायला ते काय एखादी वस्तु आहेत का, असा सवालही शिंदेंनी केला.

इंडिया आघाडी बिघाडी झालेली आहे. या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असंही शिंदे म्हणाले.

 

Exit mobile version