Download App

… तेव्हा उद्योजकांच्या घरात जिलेटीन ठेवले जायचे शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात

Eknath Shinde On Uddhav Thackeray : 13 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी

Eknath Shinde On Uddhav Thackeray : 13 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात (Aurangabad Lok Sabha) मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. यामुळे या लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती.

या सभेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही निवडणूक देशाच्या विकासाची तसेच सामान्य माणसाच्या जीवनात मोठा बदल घडविणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता संपूर्ण जगात आहे. दाओसमध्ये उद्योगपती मला भेटल्यावर म्हणाले, केंद्र सरकार आणि तुमचे कसे आहे ? मी त्यांना म्हणालो आम्ही एकच आहोत, राज्यात उद्योग आण्यासाठी अशी माहिती घेत असतात. यापूर्वी उद्योजकांच्या घरात जिलेटीन ठेवले जायचे, मात्र आता उद्योजक सुरक्षित आहेत असं म्हणत मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या सरकारने छत्रपती संभाजीनगर बाबत ठराव घेतला तो बेकायदेशीर घेतला, आमच्या सरकारने छत्रपती संभाजीनगर बाबत ठराव मंजूर केला. निवडणुकीनंतर देशात फटाके फुटके पाहिजे पाकिस्तानात नको असे एकनाथ शिंदे म्हटले.

तर प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे ही भाषा कधी केली जाते जेव्हा ताकत कमजोर होते, त्यांची ताकत सर्वांना माहिती आहे उबाठाची पण ताकत सर्वांना माहिती आहे असं म्हणत त्यांनी या सभेत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

MIM मुळे हैदराबाद मुक्त दिवस साजरा होत नाही, मोदींचा ओवैसी बंधूंवर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत तीन टप्प्यात झालेल्या मतदानात महायुती महाविकास आघाडीपेक्षा खूप पुढे आहे याची माझ्याकडे इंटेलिजन्स, पोलिस इत्यादींची रिपोर्ट आहे. असं म्हणत या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

follow us