Pune Candidate Name For Minister Post Assembly Election Result : विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election 2024) राज्यात महायुतीला मोठे यश मिळालंय. भाजप (BJP) सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. त्यातच चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजीनामा देण्याची तयारी केलीय. ते आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान आता महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी, यासाठी आमदारांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळतेय. नव्या मंत्रिमंडळात पुण्यातून तीन जणांची नावं फायनल झाली (Minister Post) असल्याची देखील माहिती मिळतेय. पुणे जिल्ह्यामध्ये 21 जागांपैकी 18 जागा महायुतीला तर फक्त दोन जागा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात महायुतीचं सरकार येणार, यावर शिक्कामोर्तब झालंय. तर मंत्रिपदासाठी भाजप, शिवसेना (शिंदे) आणि अजित पवारांच्या पक्षातील आमदारांनी तयारी सुरू केल्याचं दिसतंय.
दिल्लीतून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब! अमित शाह घोषणा करणार, एकनाथ शिंदे नाराज?
यंदा महायुतीतील विजयी उमेदवारांचा आकडा वाढलेला आहे. कोणत्या पक्षाला नेमकी किती मंत्रीपदं दिली जाणार? याचा अजून फॉर्म्युला महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केलेला नाही. परंतु आपापल्या पक्षातील आमदाराची मंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी मात्र प्रयत्न सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांची नावं फायनल झाल्याचं मानलं जातंय.
एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता कायम
महायुतीतील मित्र पक्षांतील इच्छुकांनी मंत्रिपद मिळावं, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. मात्र, अद्याप कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार, हे समोर आलेलं नाही. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील कोणत्या आमदाराला मंत्री होण्याची संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजपकडून पर्वतीच्या माधुरी मिसाळ, खडकवासल्याचे भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे सुनील कांबळे, पिंपरी-चिंचवडमधून भोसरीचे महेश लांडगे, दौंडचे राहुल कुल यांची नावं देखील चर्चेत आहेत. तर अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांचं नाव चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवतारे यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.