Transfer of State Director General of Police Rashmi Shukla : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत (Assembly Election) मोठी बातमी समोर आलीय. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळालंय. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं आहे.
रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर झाला गुन्हा दाखल; दिवाळी फराळातून पैशांची पाकिटं वाटल्याचा आरोप
निवडणूक आयोगाने या तक्रारीची तात्काळ दखल घेतली. राज्याच्या मुख्य सचिवांना रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ आयपीएस केडरमधील अधिकाऱ्याची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत तीन आयपीएस ऑफिसरची समिती नियुक्त करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलीय. INC आणि इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करून भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला, DGP महाराष्ट्र यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांना निर्देश देऊन त्यांचा पदभार पुढील सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला. मुख्य सचिवांना डीजीपी महाराष्ट्र म्हणून नियुक्तीसाठी उद्या दुपारपर्यंत तीन IPS अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
Acting on the complaints from INC and other parties, Election Commission of India orders transfer of Rashmi Shukla, DGP Maharashtra with immediate effect with directions to Chief Secretary to hand over her charge to the next senior most IPS officer in the cadre. The Chief… pic.twitter.com/DqocropZo0
— ANI (@ANI) November 4, 2024
सीईसी राजीव कुमार यांनी यापूर्वी आढावा बैठका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेदरम्यान अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्ष आणि निष्पक्ष नसून त्यांची कर्तव्ये पार पाडताना त्यांच्या वर्तनात पक्षपाती नसल्याचा इशारा दिला होता. अजूनही आमचे फोन टॅप होत आहे, अशी तक्रार काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. भारतीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने नुकतंच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं आहे. त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार असणार आहे.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीवर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट शेअर केलीय. त्यांनी म्हटलंय की, राजकीय हेतूने काम करणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली थोडी विलंबाने का होईना पण झाली. मात्र आमची रश्मी शुक्ला यांना निवडणुकीशी निगडित कोणत्याही कामात ठेवू नये. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या बदल्यांचा पुनर्विचार होऊन त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी रश्मी शुक्लांना पदावरून हटवलं, या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती? विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता, असं त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हटलंय.