Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त… तरीही बढती!

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त… तरीही बढती!

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या वादग्रस्त ठरलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालिन आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना बढती दिली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती देण्यात आली आहे. दिल्ली येथे शनिवारी (दि. ११) मोठी बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राज्यात २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ऐतिहासिक असे राजकीय नाट्य अनुभवले होते. त्यावेळी शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होता. गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावं सांगून, हा सगळा उद्योग करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या. तसेच हे सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते.

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना मोठी बढती दिली आहे. या बढतीला एसीसीकडून मंजुरी देण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावलेले आहेत. शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube