मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून असून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. एकीकडे शिंदेगट बँड-बाजासह आपला विजय साजरा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav यांनी सडकून टीका केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेला निकाल लोकशाहीवर घाला आहे, त्यामुळे या निर्णयाचा मी निषेध करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी दोन्हीही गटांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु होते. त्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दरम्यान, यावर बोलतांना जाधव म्हणाले, आज आश्चर्य याचं वाटतं की, उद्या कुणीही एखाद्या गटातून फुटावं, आणि त्याने वेगळा गट केला, तर तो पक्षचं फुटीर गटाच्या नावे व्हाव, फुटीर गटाला पक्षाचं चिन्ह मिळावं, हे लोकशाहीला मारक असल्याचं जाधव म्हणाले. त्यामुळे त्यांनी या निर्णयाचा निषेध केला.