Eknath Shinde: तुम्ही धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो मी सोडविला !, ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

  • Written By: Published:
Eknath Shinde: तुम्ही धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो मी सोडविला !, ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना पक्ष (Shivsena) व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना चोर म्हटले आहे. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडविला आहे. तुम्ही घातक आहात. लोकशाहीचा खून तुमच्या वक्तव्याहून होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

शिंदे म्हणाले, शेवटी कोणी किती काही म्हटले तरी सत्य लपविता येत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. जे कोणी आज काही बोलतायत. त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांची विचार कोणाच्या तरी दावणीला बांधले होते. त्यांचे विचार विकण्याचे मोठे पाप केले आहे. त्यांना ही चपराक आहे.

Press Conferance : उद्धव ठाकरे चिडले : कौरव, शेण खाल्ले, मोगलाई, नामर्द, चोर…

त्यांच्या बाजूला निकाल लागल्यानंतर न्यायव्यवस्थाबरोबर असते. विरोधात निकाल जातो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला आहे. न्यायव्यवस्था विकली गेली आहे. लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीचा खून झाला आहे, असे बोलत आहेत. त्यांना आजच्या निवडणूक आयोगाच्या निकालाने दाखवून दिले असल्याची टीकाही शिंदे यांनी केली आहे.

शिंदे म्हणाले, २०१९ ला तुम्ही धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता. तो आता मी सोडवला आहे. ठाकरे यांचा आता केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाकडील कार्यकर्ते दुसऱ्याकडे जाऊ लागले आहेत. खरं तुम्ही घातक आहात. लोकशाहीचा खून तुमच्या वक्तव्यातून होत आहे. या पुढे तरी सुधारा. आम्ही ५० आमदार, तेरा खासदार, शेकडे नगरसेवक चोर आहेत. लाखो चोर आहेत आणि तुम्ही एकटे साव आहे, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

दुसऱ्यांचा नेता, चिन्ह चोरले-ठाकरेंचा शिंदेवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसऱ्यांचा नेता चोरायचा दुसऱ्यांचे विचार चोरल्यासारखं दाखवायचं दुसऱ्याच चिन्ह चोरायचं आणि जिंकलो की नाही असं म्हणायचं मात्र ते जिंकू शकत नाहीत मात्र त्यांना हे कळून चुकलेला आहे की बाळासाहेबांनी शिवसेना याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत. कारण ज्याप्रमाणे सभेमध्ये एकेकाळी लोक मोदींचे मुखवटे घालून यायचे त्याप्रमाणे त्यांना बाळासाहेबांचे मुखवटे घालून लोकांसमोर फिरावे लागते पण मुखवटे घालून विचार विचार येत नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube