Fadnavis slams Rahul Gandhi and Congress : नागपूरमधील ‘मंथन 4 युवा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. “पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि महिलांना खरी अधिकारिता मिळणार असलेल्या वुमेन्स रिझर्व्हेशन बिलाला विरोध करायचा, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे. त्यांचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहेत,” असा घणाघात फडणवीसांनी केला.
इथेनॉलमुळे साखर महागली का ? विरोधकांच्या आरोपानंतर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
‘मंथन 4 युवा’ कार्यक्रम हा तरुणांच्या सहभागाचा कार्यक्रम असल्याचे फडणवीसांनी सांगितले. या कार्यक्रमात जवळपास दीड लाख तरुणांनी सहभाग घेतला, तर 4,100 मुला-मुलींनी ढोल-ताशांच्या गजरात नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला, असा दावा त्यांनी केला. तरुणांची वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काय करता येईल, यावर या कार्यक्रमात मंथन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
वाटाण्यावरुन संजय राऊत संतापले; फडणवीसांनी तो ‘कच्चा वाटाणा’ घरी नेऊन शिजवून खावा!
काँग्रेस हा दिशाहीन पक्ष
यावेळी काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असून आता तो बोलघेवड्यांचा पक्ष राहिलेला आहे. दररोज टीव्हीच्या माध्यमातून सक्रिय राहायचं आणि स्टेटमेंट द्यायचं, एवढंच काम काँग्रेसकडे राहिलेलं आहे.” तसेच मंथन 4 युवा कार्यक्रमासाठी तरुणांना पैसे देऊन आणण्यात आलेले नाही, असा दावाही त्यांनी केला.
SIR प्रक्रियेवर फडणवीस काय म्हणाले?
SIRची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून त्यामुळे आणखी बरेच मतदार पात्र ठरतील, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. प्रत्येक राजकीय पक्षाला BLA (Booth Level Agent) देण्यात आले आहेत. एकही पात्र मतदार मतदार यादीतून बाहेर राहू नये, हे BLA चे काम असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे BLA हे काम करत असून इतर पक्षांच्या BLA नेही आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन फडणवीसांनी केले.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पैसे वाटपाचा आरोप, चौकशी होणार; CM फडणवीसांच्या सूचना
