Download App

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार, वाचा सविस्तर यादी

काल महाराष्ट्रासह दहा राज्यांत नवे राज्यपाल तसच काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रलाही नवे राज्यपाल मिळाले.

  • Written By: Last Updated:

C. P. Radhakrishnan Appointed as Governor : महाराष्ट्राला आता नवे राज्यपाल मिळाले आहेत. या पाच वर्षातील हे तिसरे राज्यपाळ ठरले आहेत. काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचं पत्र जारी करण्यात आलं. तसंच, राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यानुसार संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नियुक्त्या लागू होतील. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

खासदार मानेंचा ड्रायव्हर आणि आमदारपुत्राच्या ड्रायव्हरची फ्री स्टाइल हाणामारी; एकमेंकाचे कपडे फाडले

देशाचं प्रतिनिधित्व  

तमिळनाडूचे ६७ वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केलं. ते कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. तसच, आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेत देशाचं प्रतिनिधित्वही केलं आहे.

Paris Olympics 2024 मध्ये चक दे! इंडिया, न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

‘तमिळनाडूचे मोदी’

दक्षिणेत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या भाजपसाठी महत्त्वाचे नेते म्हणून राधाकृष्णन यांचं नाव आघाडीवर आहे. केरळचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. २०१२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यावरील हल्लेखोरांना मोकाट सोडल्याबद्दल त्यांनी मेट्टुपालयममध्ये निदर्शने केली होती. त्याबद्दल त्यांना अटक झाली होती. त्याआधी १९९८ मध्ये कोइमतूरमधील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळविला होता. २०१४ तसंच २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेसाठी कडवी झुंज दिली होती. अशा कामगिरीबद्दल त्यांना ‘तमिळनाडूचे मोदी’ असे संबोधले जाते

पाच वर्षांतील तिसरे राज्यपाल

राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. रमेश बैस यांची गेल्या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती. त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर २०१९ ते १७ फेब्रुवारी २०२३ अशा सुमारे साडे तीन वर्षांच्या कालावधीत हे पद भूषविले. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे एकूण २४वे राज्यपाल ठरले आहेत.

नवे राज्यपाल

follow us