मोठी बातमी! राज्यपाल कोट्यातील १२ आमदारांची ऑगस्ट महिन्यात नियुक्ती होणार

मोठी बातमी! राज्यपाल कोट्यातील १२ आमदारांची ऑगस्ट महिन्यात नियुक्ती होणार

Governor Appointed MLA :  राज्यपाल कोट्यातील 12 आमदारांची ऑगस्टमध्ये नियुक्ती होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यपाल कोट्यातील 12 आमदारांमुळे महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील वाद शिगेला पोहचला होता. (Governor) अखेर आता या विषयावर पडदा पडणार असं चित्र आहे. (MLA) पुढील महिन्यात या आमदारांच्या नियुक्त्या होणार आहेत.

नियुक्तीचा घोळ तीन वर्षांपासून

विधानपरिषदेत जास्तीत जास्त संख्याबळ करण्यासाठी सर्व रिक्त जागा भरण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू आहेत. राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबतचा घोळ गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून असल्याचं दिसून येतंय.

भगतसिंह कोश्यारी मी भेटल्याशिवाय जाणारच नाही; छगन भुजबळांच्या भेटीवर शरद पवार काय म्हणाले?

राज्यात महाविकास आघाडी सरकरा सत्तेत आल्यानंतर त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 12 सदस्यांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांकडून या यादीला ना हिरवा कंदील देण्यात आला, ना यादी मंजूर करण्याबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलं. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता.

विधानपरिषदेतील सभापती पद रिलायन्स जिओच्या रिचार्जला BSNLची टक्कर; १६० दिवसांच्या प्लानमध्ये पैशांचीही होईल बचत

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे सरकारकडून नवीन यादी सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याचवेळी दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. विधानपरिषदेतील सभापती पद रिक्त आहे. याबाबत लवकरात लवकर निवडणूक जाहीर करावी याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube