कॉक्रोच जनता पार्टी हिम्मत असेल तर निवडणुकीला सामोरे जा’; कंगना रनौत यांची आंदोलनावर टीका!
CJP वाल्यांनो, तुमच्यात जर हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा,” असे आव्हान कंगना रणौत यांनी कॉक्रोच जनता पार्टीला दिले.
कंगना रणौत यांनी पुढे सांगितले की, लोकशाहीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या सरकारला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. एखाद्या मागणीसाठी आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार असला, तरी सरकारवर दबाव आणून निर्णय बदलण्यास भाग पाडण्याची पद्धत योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मोठी बातमी! जंतरमंतरवरचं अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, नड्डांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ दाखल
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी NEET पेपरफुटी आणि राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. या मुद्द्यावरही कंगना रणौत यांनी भाष्य केले. “संसद ही चर्चा आणि उत्तरदायित्वासाठी आहे, गोंधळ घालण्यासाठी नाही,” असे कंगना रणौत म्हणाल्या. संसदीय अधिवेशनाचा मुख्य उद्देश विविध विषयांवर सखोल चर्चा करणे आणि सरकारला उत्तरदायी धरणे हा आहे. विरोधकांनी त्यांचे प्रश्न सभागृहात मांडावेत, याला आपला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलकांवर अश्रूधुरांचा मारा; CJP चे शिष्टमंडळ सरकारशी बोलणी करण्यासाठी रवाना!
मात्र, सतत घोषणाबाजी करून संसदेचे कामकाज ठप्प करणे ही लोकशाहीसाठी योग्य पद्धत नसल्याचे कंगना रणौत यांनी म्हटले. विरोधकांनी आपले मुद्दे चर्चेच्या माध्यमातून मांडावेत आणि सरकारकडून उत्तरे मागावीत, असे त्यांनी सांगितले. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आणि दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी, या पार्श्वभूमीवर कंगना रणौत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. CJPच्या आंदोलनावर त्यांनी केलेली टीका आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचे दिलेले आव्हान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.