आंदोलकांवर अश्रूधुरांचा मारा; CJP चे शिष्टमंडळ सरकारशी बोलणी करण्यासाठी रवाना!

अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलकांचा मोर्चा संसदेकडे रवाना झाला असतानाच, पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुरांचाही वापर केला

Cjp 1

Cockroach Janta Party delegation leaves for talks with the government : कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांचा मोर्चा संसदेकडे (Parliament March) रवाना झाला असतानाच, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जसह अश्रुधुरांचाही मारा करण्यात आला. तर पार्टीचे एक शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करण्यासाठी निघाले आहे. या शिष्टमंडळात आशुतोष रांका आणि सौरव दास यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

‘मी ठणठणीत मला संसद मोर्चात जायचयं, कृपया मला डिस्चार्ज द्या’; वांगचुक यांचे रुग्णालयाला पत्र

सरकारकडून सकाळी चर्चेसाठी संपर्क साधण्यात आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने सरकारशी संवाद साधण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहे. दरम्यान, अभिजीत दिपके हे आंदोलकांसह मोर्चाचे नेतृत्व करत संसदेकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे एकीकडे आंदोलनाचा मोर्चा पुढे जात असताना दुसरीकडे सरकार आणि पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; पेपर लीक अन् राम मंदिर चोरी मुद्दा गाजला, कामकाज तहकूब

सौरव दास (Saurav Das) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घडामोडीची माहिती दिली. सकाळी 11 वाजून 52 मिनिटांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने ते आणि आशुतोष रांका केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. सरकारने सकाळी चर्चेसाठी संपर्क साधला होता आणि पार्टीच्या मागण्या स्पष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

मेट्रो बंद केल्या, इंटरनेट जामर लावले, लाठीचार्ज केला तरीही CJP आंदोलक मागे हटले नाहीत

“सरकारने सकाळी चर्चेसाठी संपर्क साधला होता. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. आपण नक्कीच जिंकू,” असा विश्वास सौरव दास यांनी पोस्टमधून व्यक्त केला आहे.

पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक ठरेल; अधिवेशनापूर्वीच पंतप्रधान मोदींचा विश्वास, अनेक मुद्यांवर होणार चर्चा!

दरम्यान, आंदोलनासाठी मोठ्या संख्येने तरुण एकत्र आले आहेत. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा संसदेकडे रवाना झाल्याने प्रशासनासमोरही आव्हान निर्माण झाले आहे. आंदोलनाला परवानगी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  आता सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळामध्ये होणाऱ्या चर्चेत कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका बाजूला आंदोलकांचा मोर्चा संसदेकडे पुढे जात आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारशी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनाचा पुढील मार्ग चर्चेतून निघतो की आंदोलन आणखी तीव्र होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us