मेट्रो बंद केल्या, इंटरनेट जामर लावले, लाठीचार्ज केला तरीही CJP आंदोलक मागे हटले नाहीत
कॉक्रोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे, मात्र पोलिसांकडून जंतर-मंतर वरील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
Lathi-charge on protesters, tense atmosphere at Jantar Mantar: दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आज, 20 जुलै रोजी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने आंदोलक जंतर-मंतर परिसरात जमा झाले आहेत. मात्र, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नसल्याने पोलिसांनी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
‘ही दुसरी स्वातंत्र्य चळवळ’, संसदेवरील मोर्चा होणारच! रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा संदेश
आंदोलकांची वाढती गर्दी आणि संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती असून, इंटरनेट जामरही लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जंतर-मंतरकडे जाणाऱ्या मेट्रो सेवाही प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे परिसरातील दळणवळणावरही परिणाम झाला आहे.
मोठी बातमी! सोनम वांगचुक उपोषण सोडण्यास तयार…, सरकारपुढं ठेवल्या ‘या’ 3 अटी
मोर्चाला परवानगी नसल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्यामुळे जंतर-मंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागले आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलक करत आहेत. थोड्याच वेळात संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याची तयारी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सोनम वांगचुक यांचे रुग्णालयातूनच उपोषण सुरु आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखत आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, पोलिस आणि आंदोलक यांच्यातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोर्चाला परवानगी नसल्याने पुढील काही तासांत परिस्थिती आणखी चिघळते की प्रशासन आणि आंदोलकांमध्ये तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.