Gunratna Sadavarte : मराठा आरक्षण विरोध असो, अथवा महाविकास आघाडीच्याविरोधात आंदोलने..एक नाव आवर्जून समोर येत ते म्हणजे विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते. आता याच गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची लेक झेन सदावर्ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला निघालीयं. तिच्या यशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित राहून झेनला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
देवाभाऊ हिंदुस्थानच्या आजूबाजूला बघा, नेपाळमध्ये जे घडलं ते आपल्याकडे… पवारांचा इशारा
मराठा आंदोलनाला विरोध केल्याने गुणरत्न सदावर्ते चांगलेच चर्चेत होते. सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयातील वकील असून त्यांना वकीली क्षेत्रातला मोठा अनुभव आहे. काही वर्षांपासून सदावर्ते राजकीय भूमिका घेत असल्याने माध्यमांमध्ये चांगलेच चर्चेत आले आहेत. ठाकरे बंधूंवर टीका असो किंवा मराठा आरक्षणाच्या मागणीला केलेला विरोध असो, त्यामुळे सदावर्ते दाम्पत्य नेहमीच माध्यमांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी सदावर्ते कार्यक्रमास उपस्थिती दर्शवल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होत आहे.
सदावर्ते यांची लेक झेन हिने जागतिक भरारी घेत थेट ईस्ट इंडिया लंडन युनिव्हर्सिटीमध्ये वकीलच्या पदवी शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. झेनने एलएलबी ऑनर्ससाठी पुढे मार्गक्रमण करत बॅरिस्टर पदवीच्या शिक्षणासाठी आता लंडन गाठले आहे. विशेष म्हणजे झेनने स्वतःच्या गुणवत्तेवर राष्ट्रीय गुणवंतांच्या आधारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू : अच्युत गोडबोले
झेन आपले पुढील शिक्षण एलएलबी ऑनर्स लंडन येथे शिकणार असल्याने तिच्या सन्मानार्थ सदावर्ते कुटुंबीयांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन झेनचा सत्कार केला, तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक प्रवासासाठी तिला आशीर्वादही दिला. विधी क्षेत्रात उज्वल भविष्य घडविण्यासाठी भुजबळ यांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. मुंबईतील आयटीसी ग्रँड या पंचतारांकीत हॉटेलमध्ये रविवरी हा सोहळा पार पडला असून विविध राजकीय पक्षातील मान्यवर, तसेच ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.