Harshvardhan Patil on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानिमित्तानं अनेकांचे राजकीय रुसवे फुगवे बाहेर पडताना दिसत आहेत. असंच काहीसं महायुतीत घडताना पाहायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar group)नेत्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)याच्याकडे केली आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल, 9 रुपये संपत्ती असलेले महास्वामी गडकरींविरोधात रिंगणात
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ही अजित पवार गटातील नेते आपल्याला थेट जाहीर भाषणांमधून धमक्या देत असल्याचे म्हटले आहे. महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी युतीधर्म पाळायला हवा.
Bhaiyaa Ji : अब निवेदन नही…! मनोज वाजपेयींच्या ‘भैय्याजी’चा जबरदस्त टिझर रिलीज
या सर्व मुद्यांबद्दल आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. आज हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याचवेळी बारामती लोकसभा निवडणुकीबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आता बारामती लोकसभा निवडणूक अजितदादांसाठी सोपी असणार नाही. त्याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी यापूर्वीच अजितदादांविरोधात भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर आपण बारामती लोकसभेसाठी उमेदवारी करणार असल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर आता इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी देखील पत्रकार परिषदेत आपल्याला अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला होता. आज हर्षवर्धन पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे.