Download App

मोदींनंतर अमित शाहंचा महाराष्ट्र दौरा; नांदेडमध्ये चिखलीकरांसाठी प्रचाराची तोफ धडाडणार

Home Minister Amit Shah Maharashtra Visit For Nanded : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील महायुतीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांच्या सभा झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Home Minister Amit Shah ) हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आज (11 एप्रिल ) नांदेडमधील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर ( Pratap Patil Chikhalikar ) यांच्या प्रचारासाठी नांदेडमधील नरसी या गावात अमित शाह सभा घेणार आहेत.

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार-ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी

या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह खासदार अशोक चव्हाण आणि भाजपसह महायुतीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सध्या राज्यात महायुतीने केंद्रात पुन्हा एकदा भाजप सरकार आणण्यासाठी 45 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी केंद्रातील भाजप नेत्यांनी दंड थोपटले आहेत. त्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या सभांचं राज्यात आयोजन करण्यात आलं आहे.

Elon Musk पहिल्यांदाच भारतात येणार; ट्विट करत मोदींच्या भेटीबाबत व्यक्त केली उत्सुकता

या अगोदर बुधावारी नागपूरमधील रामटेक मतदारसंघातील (Ramtek Loksabha) महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मोदींनी हजेरी लावली. तर सोमवारी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. ही मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिली प्रचार सभा होती. या दोनही सभांमध्ये मोदी यांनी कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता.

follow us

वेब स्टोरीज