Download App

Maharashtra Politics : योग्यवेळी ब्रेकिंग न्यूज देईल, गृहमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य

  • Written By: Last Updated:

मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकारणीमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याबाबतच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे त्यावेळी एक गृहमंत्री जेलमध्ये होते, दुसरे गृहमंत्री अस करतील असं मला वाटत नाही पण ज्या कोणी सर्वोच्च व्यक्तीने मला जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिले होते.’

‘त्याबद्दल मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंना कल्पना होती. तसेच ते त्यांचे आदेश होते की, मूक त्यांची संमती होती एवढचं बघायचयं. तर एका माणसाचा हा निर्णय असू शकत नाही बरेच लोक त्यामागे काम करत होते. त्यामुळे हे जे बरेच लोक आहेत. सगळं काही पहिल्या मुलाखतीत सांगणार नाही. ब्रेकिंग न्यूज एकदम देत नसतो मी. त्यामुळे योग्यवेळी बाकी न्यूज देईल. एवढी घाई करू नका.’ असं सूचक वक्तव्य एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Sanjay Raut : फडणवीसांनी उपचार करुन घ्यावेत, राऊतांचा निशाणा

यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले,’महाविकास आघाडी मला जेलमध्ये टाकू सुद्धा शकली नसती. तेवढी त्यांची ताकदही नाही, हिंमतही नाही, तेवढी क्षमताही नाही. तसेच मला जेलमध्ये टाकू शकतील असं मी काही केलं ही नाही. पण त्यांनी जंग जंग पछाडलं, प्रयत्न केले, कागदपत्र तयार केले खोटे कागदपत्र तयार करण्याचा प्रयत्न केले. मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आली होती.’

‘शेवटी मी पाच वर्ष गृहमंत्री राहीलो आहे. गृह खात्यामध्ये माझेही चांगले संबंध आहेत. मी कधीही पैसे घेऊन पोस्टींग दिलं नाही. मिरीटवर लोकांना पोस्टींग दिलं. ज्यांना कधीही आपेक्षाही नव्हत्या की त्यांना अशी पोस्ट मिळू शकतात. कधी कोणाला अपमानित केलं नाही. त्यामुळे पोलीस विभागामध्ये माझ्याबद्दल प्रेम होतं.’

‘त्यामुळे ते जे प्रयत्न करायचे ते मला कळायचे. किंबहुना ते जे प्रयत्न करायचे त्यामध्ये कोणीही त्यांना मदत करत नव्हतं. अधिकाऱ्यांनाही माहीत होतं की, हे वागणं चांगलं नाही. तर महाराष्ट्रातील ब्युराक्रसी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. पोलीसही चांगले आहेत त्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत.’

Tags

follow us