अजित पवारांना ‘दादा’ नाव कसं पडलं? दादांनी रंगवूनच सांगितलं…

भावंडांमध्ये मीच मोठा होतो, त्यामुळे सगळेच मला दादा म्हणायचे, म्हणूनच मला दादा नाव पडलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीतदरम्यान त्यांना दादा नाव कसं पडलं याचं गुपित विचारण्यात आलं होतं. त्यावर भाष्य करताना अजितदादांनी बारामतीतल्या जुन्या आठवणी शेअर करीत रंगवून सांगितलं आहे. ‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत… […]

Ajit Pawar

Ajit Pawar

भावंडांमध्ये मीच मोठा होतो, त्यामुळे सगळेच मला दादा म्हणायचे, म्हणूनच मला दादा नाव पडलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीतदरम्यान त्यांना दादा नाव कसं पडलं याचं गुपित विचारण्यात आलं होतं. त्यावर भाष्य करताना अजितदादांनी बारामतीतल्या जुन्या आठवणी शेअर करीत रंगवून सांगितलं आहे.

अजितदादा म्हणाले, आम्ही बारामती सगळेच भावंड राहतो. घरातमध्ये काम करीत असलेल्या बाई, दुधवाले, पेपरवाले, सगळेच मला दादा म्हणून हाक मारीत असत. त्यानंतर शेतात गेल्यांनंतर शेतातले गडी आम्हाला मालक म्हणायचे. शेतातले गडी आम्हाला मालक म्हणत असल्याने त्यावेळी आम्हाला खूप चांगलं वाटत असतं. आम्हाला मोठेपणा मिळत असल्याने मोठी गंमत वाटत असायची, पण त्या काळातली ती पद्धतच असल्याचं दादा म्हणाले आहेत.

‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत…

तसेच आजही सोलापूरात अनेकजण मालक म्हणतात. राजन पाटील यांच्यासह इतर अनेक लोकांना मालक म्हणायचे. पण बारामतीत राहणाऱ्या भावंडांमध्ये मुलगा म्हणून मीच मोठा असल्याने ते दादा, दादा अशी हाक मला मारत असत. त्यावरुन मला दादा हे नाव पडल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे गटाचा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच मोठा आरोप; अधिवेशन पुन्हा तापणार?

kirit Somaiya Video : ‘त्या’ ताईने पुढे यावं, चित्रा वाघ यांचं खुलं आव्हान…

राजकारणात अजित पवार म्हणजे रोखठोक बोलणारा माणूस अशी त्यांची ओळख. त्यामुळे सत्ता कोणाचीही असो, चर्चा मात्र अजित पवारांचीच होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. सध्याही अजित पवार यांचीच चर्चा सुरु असून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीत अजितदादांनी केलेल्या बंडावरुन राजकारण तापलं आहे.

आपल्या समर्थकांसह अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. एवढंच नाहीतर अजित पवारांसह सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांना मंत्रिपदेही देण्यात आली आहेत. त्यावरुन राज्यात महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षामध्ये चांगलचं राजकारण तापत असल्याचं दिसून येत आहे.

Exit mobile version