Download App

मला माफ करा, माझ्याकडून अनावधानाने बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला; आव्हाडांनी मागितली माफी…

माझ्याकडून मनुस्मृतीचे पुस्तक फाडत असताना बाबासाहेबांची प्रतिमा फाडली गेली. त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ‘एससीईआरटी’ने मांडल्यानंतर राष्ट्रवादीची (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) आक्रमक भूमिका घेतली. या प्रस्तावाविरोधात त्यांनी आज (२८ मे) महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. यावर आता खुद्द आव्हांनी स्पष्टीकरणं दिलं.

Mirzapur Season 3 : ‘मिर्झापूर 3’ मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट विषयी मोठा खुलासा 

जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ जारी केला. त्यात ते म्हणाले की, मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकात समावेश होत असल्याच्या निषेधार्थ आम्ही महाड येथं आंदोलन केलं. कारण, मनु हा विषमतेचा जन्मदाता आहे. स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे. अशा मनुचा शालेय पुस्तकात समावेश करू नये, यासाठी आम्ही आंदोलन केलं. यावेळी निषेध म्हणून आम्ही मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडलं. त्यावर बाळासाहेबांचा देखील फोटो होता, हे लक्षात आलंचं नाही. त्यामुळं बाबासाहेबांचा फोटोही फाडल्या गेल्याचं आव्हाड म्हणाले.

“तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कारवाईला तयार राहा”; CM शिंदेंची राऊतांना नोटीस 

पुढं बोलतांना ते म्हणाले, माझ्याकडून अनावधानाने हे घडलं. ही आमची अक्षम्य चूक आहे. आम्ही काही मुद्दाम केलेलं नाही. मनुस्मृती फाडल्याचं दाखवावं म्हणून आम्ही ते पोस्टर फाडलं. त्यातून कोणृणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, कृपया महाराष्ट्रातील जनतेने मला माफ करावे, अशा शब्दात आव्हाडांनी माफी मागितली.

आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचा फोटो फाडण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला. आनंद परांजपे यांनी महाड येथे झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसंच आव्हाड हे नाटक करत आहे. प्रसिध्दीसाठी नौटंकी करत आहे, अशी टीकाही परांजपे यांनी केली.

बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा
‘मनुस्मृती’चं दहन करतांना स्टंटबाजीच्या नादात आव्हाड यांनी बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून अमोल मिटकरी देखील आक्रमक झाले. डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडून त्यांनी राष्ट्राचा अवमान केला आहे, त्यामुळं आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मिटकरींनी केली. तसेच आव्हाड यांनी महाडमध्येच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागितली नाही, तर संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार मिटकरी यांनी दिला आहे.

follow us

वेब स्टोरीज