Devendra Fadnavis : वकील गुणरत्न सदावर्ते यांना मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करण्याचा किंवा मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा काहीही अधिकार नाही. ते जे बोलतात, त्या गोष्टींना अजिबात समर्थनीय म्हणता येणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना कडक शब्दांत ठणकावले. तसेच सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. विरोधकांच्या आरोपाला फडणवसांनी प्रत्युत्तर दिले.
टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सदावर्ते कोणाचा माणूस आहे हे माहिती नाही. त्यांचा कोण वापर करतंय की स्वत: बोलतात हे माहिती नाही. माझा संबंध नाही. सदावर्ते हा जो व्यक्ती आहे त्याला मी फक्त दोन वेळा भेटलो आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात अपघाताने भेटलो आहे. माझी कधी भेटही झाली नाही. अशा प्रकारचे आरोप करणारे कोण आहे? तर जे लोक आरक्षण देऊ शकले नाहीत ते बोलतात. मी आरक्षण दिले आणि ते हायकोर्टात टिकले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, लोकांच्या भावना भडकतील अशाप्रकारे जर समाजाच्या विरोधात बोललं तर त्याची प्रतिक्रिया येते. ही प्रतिक्रिया योग्य नाही पण ते स्वत: संविधानाच तज्ञ म्हणतात. संविधानात एखाद्या समाजाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे का? समाजात तेढ निर्माण होईल असे बोलण्याचा अधिकार आहे का? त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या समाजाविरोधात बोलणं अयोग्य आहे.
मराठा आरक्षण आंदोलकांची नजर चुकवत CM शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या नावाने ज्या नेत्यांनी राजकारण केलं त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मी दिलं होतं. आजवर मराठा समाजासाठी जे लोक काहीही करु शकले नाहीत अशाच लोकांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी मी माझी जात बदलू शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मी ब्राह्मण आहे. मी जात बदलण्याचं कारण नाही. मात्र मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी राजकारण केलं त्यांनी वाटंत की मी सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं असं त्यांनी म्हटलं आहे.