भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजीत तांबेंच्या बाबत मोठे विधान केले आहे. तांबे भाजपमध्ये आले तर पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे महाजन म्हणाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका भूमीपुजनाच्या कार्यक्रमाला आले असताना बोलत होते.
तांबे सध्या काँग्रेसमध्ये नसून अपक्ष असल्याचे त्यांनी स्वत: च सांगितल्याचे महाजनांनी म्हटले आहे. हा आमच्या फायद्या तोट्याचा विषय नसून, काँग्रेस पक्षातील अंतर्गत मामला आहे. त्यामुळे आपण त्याविषयी बोलणार नाही असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान तांबेंचे काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांना एबी फॉर्म देखील चुकीचा दिल्याचा आरोप तांबेंनी केल्याचे महाजन म्हणाले आहेत. तांबेंना त्यांच्या घरातून मोठी राजकीय परंपरा आहे. त्यांचे वडील देखली आमदार होते, असेही यावेळी महाजनांनी सांगितले.
सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भरघोस मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण अपक्ष निवडूण आल्याने अपक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.