पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा पक्षाला रामराम, लवकरच भाजपमध्य प्रवेश?
ठाकरे सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा.
City President Sanjog Waghere bids farewell to the party : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) यांना मोठा धक्का बसला आहे. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी राज्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे(Sanjog Waghere) यांनी राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. वाघेरे यांनी शहराध्यक्ष पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.
ब्रेकिंग : अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; आता पुढचा ‘डाव’ फडणवीस खेळणार
संजोग वाघेरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र राजीनाम्यानंतर त्यांनी म्हटलंय की, ‘होय मी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. पुढचा निर्णय लवकरच घेतला जाईल तेव्हा आपल्याला कळेल. मात्र, मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. पण कुटुंबातील इतर सदस्य लढवू शकतात’
