Download App

EVM प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन, ठाकरे गटाकडून ईव्हीएम हटवा, ‘लोकशाही वाचवा’चा नारा

Shiv Sena Protests Against EVM : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच देशात आता

  • Written By: Last Updated:

Shiv Sena Protests Against EVM : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच देशात आता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावे अशी मागणी देखील विरोधकांकडून निवडणूक आयोगाकडे (Election Commission) करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष (NCPSP), शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातील नेते ईव्हीएमवरून महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधत आहे.

महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीने (VBA) देखील राज्यात ईव्हीएम हटाव मोहीम सुरु केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पक्ष पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम विरोधात पुरावे शोधण्याचे आदेश दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेनेकडून ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढाई करण्याचा विचार सुरू आहे.

यातच आज शिवसेना ठाकरे गटाकडून ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे अरबी समुद्रात (Arabian Sea) विसर्जन करण्यात आले. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या आंदोलनाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोराने सुरु आहे.

ईव्हीएम विसर्जित केले नाही तर लोकशाही विसर्जित होईल,प्रगत देशात ईव्हीएम नाही मग भारतात का ? ईव्हीएम हटवा,लोकशाही वाचवा असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले आणि ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखील चित्रे यांच्याकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक ईव्हीएमच्या मुद्द्याला घेऊन आमने सामने आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागा जिंकेल आहे. यामध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकले आहे. भाजपने (BJP) या विधानसभा निवडणुकीत 131, शिवसेना (शिंदे गट) 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागांवर यश आले आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर विजय प्राप्त झाला आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने 20, काँग्रेसने 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10 जागांवर विजय मिळावला आहे.

PM Vishwakarma Scheme : मोदी सरकारची सुपरहिट योजना, मिळणार 5% व्याजावर 3 लाखांचे कर्ज

follow us