Download App

माजी महापौरांवरील गोळीबार राजकीय षडयंत्र, 4 जूननंतर विरोधकांना बंदूकीच्या धाकावर…; जलील यांचा आरोप

4 जूनला लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील. ताकदवर लोक बंदुकीचा धाक दाखवतील. - इम्तियाज जलील

Imtiaz Jalil On Abdul Malik firing : काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलि (Abdul Malik) यांच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारात मलिक हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आज अब्दुल मलिक यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘इंडियाला’ बहुमत मिळाल्यास 48 तासांत पंतप्रधान बनणार अन् एनडीएच्या घटक पक्षांना…; कॉंग्रेसचं नेत्याचं मोठं विधान 

जलील माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, अब्दुल मलिक आणि त्यांच्या भावाने मालेगावात एमआयएम पक्ष रूजावा यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यावेळी देखील आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. प्रस्थापित पक्षांकडून एमआयएमच्या कार्यकर्त्यांना खूप विरोध झाला होता. आमच्यावर अनेक हल्ले देखील झाले होते. तरीही लोकांना एमआयएम पक्ष हवा होता. अब्दुल मलिक यांच्यावर झालेला गोळीबार हा व्यक्तीगत वादातून नव्हे तर राजकीय वादातून झाला आहे. एमआयएमचे मालेगावमधून बस्तान उखडून टाकण्यासाठीच हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप जलील यांनी केला.

भाविकांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली, 21 ठार तर 47 जण गंभीर 

या प्रकरणात मालमत्तेवरून वाद असल्याचं कुठंही दिसत नाही.  त्याची मी माहिती घेतली आहे. या प्रकरणानंतर मला असे वाटते की कुठेतरी एमआयएमच्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, असं जलील म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, 4 जूनला लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील. ताकदवर लोक बंदुकीचा धाक दाखवतील. आणि बंदुकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानापूत करतील, असंही जलील यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणात 20-21 वर्षांच्या मुलांना पुढे केलं जात आहे. मात्र, या गोळीबारात राजकीय पक्षांच्या नेत्यांचा हात असल्याचं समोर येईल. फक्त पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अटक करणे आमच्यासाठी आवश्यक नाही. यामध्ये कोणाचा कट आहे ते पोलिसांनी शोधावं. हे प्रकरण राजकीय षडयंत्र आहे यात वाद नाही, असं जलील म्हणाले.

 

follow us