Download App

‘आदित्य ठाकरे बैठकीत नाहीतर जेलमध्ये असणार’; नारायण राणेंनी सांगितली भविष्यवाणी

Narayan Rane On Aaditya Thackerya : राज्यात सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर कोणत्याही प्रकरणावरुन टीका केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याची परिस्थिती आहे. अशातच नूकताच ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांचा कोकण दौरा पार पडला. या दौऱ्यातून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला. त्यानंतर लगेचच आज केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंची भविष्यवाणीच सांगितली आहे.

Jhimaa 2 चा तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर धुमाकुळ; जमवला ‘एवढा’ गल्ला

नारायण राणे म्हणाले, जाहीर सभा न घेऊ शकणारे खळ्यात सभा घेण्यासाठी आले आहेत, आज शिवसेनेची काय स्थिती? काही दिवसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे बैठकीत नाहीतर जेलमध्ये असणार असल्याची भविष्यवाणी नारायण राणे यांनी सांगितलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही जेलमध्येच असणार आहेत. शिवसेसेनेचं आता काहीही राहिलं नसून त्यांचे 160 आमदार निवडून येणार म्हणातहेत, अशी टीकाही नारायण राणे यांनी ठाकरे गटावर केली आहे.

तेलंगणात भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण, हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे आश्वासन

खोक्यांवर बोलणं सोडा…:
एकनाथ शिंदे हा पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाने खोक-खोके बोलायचं सोडून द्यावं कारण निवडणुकीत तुमचं काहीही होणार नाही, या शब्दांत खोके-खोके बोलणाऱ्यांना नारायण राणे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सुनावलं आहे.

सगळं माहितीये पण..,
ज्यांनी पाकिटांची डिलिव्हरी केली त्यांनी बोलू नये. कुठे गेले खोके, कसे जात होते ते? वेळ कुठली असायची, कुणाच्या हातात दिले, कुठल्या माळ्यावर जायचे? मला सगळं माहिती आहे. पण त्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे रहायचे म्हणून मला त्यावर अधिक काही बोलायचं नाही.

नाशिक, जळगाव, नगरला गारपिटीने झोडपले, कांदा, द्राक्ष बागांचे नुकसान, बळीराजा चितेंत

दरम्यान, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा पार पडला. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी करबुडे, महाड, कुडाळ, बांबार्डे, कणकवली, देवगड, राजापूर, अशा ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यासोबतच छोटेखानी सभा घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांच्या निवासस्थानीही भेट दिली होती.

Tags

follow us