टीम इंडियाचे शिलेदार मोदींच्या भेटीला; खास वेलकम करत मोदींनी दिल्या शुभेच्छा

भारतीय संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.

Team India

Team India

Indian Cricket Team Player’s meet PM Modi : भारतीय क्रिकेट संघ विजयी होऊन भारतात दाखल झाला आहे. खेळाडूंचं विमान दिल्लीत येताच दिल्लीकरांनी जल्लोषात खेळाडूंंचं स्वागत केलं. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, हातात तिरंगा ध्वज आणि विजयी भारताच्या घोषणा.. असं डोळ्यांना सुखावणारं दृश्य दिल्लीत दिसलं. यानंतर संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Narendra Modi) भेट घेतली. मोदींनीही टीम इंडियाच्या या विजयी (Team India) शिलेदारांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मोदींनी या खेळाडूंचा सत्कार केला तसेच त्यांच्याशी संवाद  साधला. या खास भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर आता सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. येथून मुंबईला रवाना होणार आहेत. येथील वानखेडे स्टेडियमवर 2011 साली भारतीय संघाने वनडे विश्वचषक जिंकला होता. आता याच मैदानावर टी 20 विश्वचषक विजेत्या संघाचा सन्मान करण्यात येणार आहे.

IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न

महाराष्ट्राच्या विधिमंडळातही होणार सत्कार

टीम इंडियाने टी 20 विश्वचषक पटकावल्यानंर आज भारतीय संघाचं (Team India) मुंबईत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मुंबईत आल्यानंतर आता खेळाडू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

रोहित वर्ल्डकप जिंकणारा तिसरा कर्णधार

कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२००७ आणि २०११) नंतर ३७ वर्षीय रोहित शर्मा हा टी-२० विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. भारतीय कर्णधार आता जिंकलेल्या ५० टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विश्वचषक अंतिम सामना हा त्याच्या कारकिर्दीतील ५वा विजय आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात संघाकडून अप्रतिम कामगिरी केल्यानंतर रोहितने टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारलं. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत एकही सामना न गमावता टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. यामुळे ११ वर्षांनी आयसीसीची ट्रॉफी जिंकत भारताने दुष्काळ संपवला.

T20 World Cup : वॉर्नरचा गुडबाय; ‘या’ दिग्गज खेळाडूंनाही क्रिकेट निवृत्तीचे वेध

Exit mobile version