Inquiry of Sandhya Sonawane by CID : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरण राज्यात गाजत आहे. या घटनेला वीस दिवस होऊनही मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांनी घेरले आहे. मुंडे यांचे जवळचे वाल्मिक कराड यांच्या या प्रकरणात हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून (CID) सुरू आहे. या प्रकरणात रविवारी एक मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे (Sandhya Sonawane) यांच्यासह काही जणांची सीआयडीने चौकशी केली आहे. दुपारी बारा वाजता संध्या सोनवणे या चौकशीसाठी बीड शहर पोलिस ठाण्यात आल्या होत्या. रात्री सातवाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
वाल्मिक कराडला का अटक होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?, वडेट्टीवार संतापले…
या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना संध्या सोनवणे म्हणाल्या, राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्यामुळे माझी चौकशी झाली आहे. काल परवा पण येथील जिल्हाध्यक्षाची चौकशी झाली आहे. पोलिस यंत्रणेला जी माहिती हवी आहे. ती देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या परीने जे काही सांगता येत होतं, ते मी सांगितले आहे. चौकशीचे मुद्दे बाहेर सांगू शकत नाही. माझ्या आधीही अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. मी एकटीच नाही. पक्षांतर्गत काम करत असताना जी काही माहिती पोलिस यंत्रणेला हवी असते ती दिली आहे.
…त्यांना कडक शासन करा, अन्यथा सरकाjवर ठपका पडेल, गोगावलेंचे बीड हत्या प्रकरणावर मोठं विधान
दोन दिवसांपासून 60 जणांची चौकशी
गेल्या दोन दिवसांपासून सीआयडीचे पथक हे बीडमध्ये आहे. सीआयडीबरोबर बीड पोलिसही देशमुख हत्याकांड प्रकरणात तपास करत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आले आहे. दोन कोटींच्या खंडणीप्रकरणात वाल्मिक कराड फरार आहे. दोन्ही प्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड पोलिसांना हवा आहे. परंतु तो फरार झालेला आहे. तो परराज्यात लपलेला असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराडच्या कॉल डिटेल्सवरून अनेकांना चौकशीला बोलविण्यात येत आहे. त्याच्या पत्नीची काल सीआयडीने चौकशी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची चौकशी ही करण्यात आली आहे. आतापर्यंत 55-60 जणांची चौकशी करण्यात आली आहे.