Download App

‘इन्स्टाग्राम’चा राजकीय कंटेटला ब्रेक! लोकसभा निवडणुकांआधी नेते अन् पक्षांना मोठा धक्का

Instagram Threads to Stop Promote Political Content : निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. आजच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा दबदबा आहे. फेसबूक, ट्विटर, इन्टाग्राम आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर राजकारणाचा बार उडालेला दिसतो. एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची किमया सोशल मीडियाने साधली जात आहे. सभा, मेळावे सुद्धा लाईव्ह होतात. राजकीय शब्दांचे वार-पलटवारही येथेच दिसतात. मात्र,आता अशी एक बातमी आली आहे जी राजकारणी मंडळींच्या पोटात नक्कीच गोळा आणणारी आहे. ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘थ्रेड्स’ या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (Instagram Threads to Stop Promote Political Content) आता राजकीय कंटेंटला प्रोत्साहन दिले जाणार नाही. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी या निर्णयाची घोषणा केली. याबाबत त्यांनी आपल्या थ्रेड्स हँडलवरूव एक पोस्ट शेअर केली आहे.

कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा फटका भारतासह ज्या देशांत निवडणुका आहेत तेथील नेतेमंडळी, राजकीय अभियान चालविणाऱ्या संस्थांना बसणार आहे. कारण, 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. या निवडणुकांची जय्यत तयारी राजकीय पक्षांनी चालवली आहे. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला जाणार आहे. मात्र, यातील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) आणि ‘थ्रेड्स’ ही (Threads) दोन आयुधांवर आता काही प्रमाणात बंधने येणार आहेत. आगामी काळात येथे पॉलिटिकल कंटेंट (Political Content) प्रमोट करणं कंपनी बंद करणार आहे.

फेसबुक-इन्स्टाग्रामला ठोठावला कोट्यावधींचा दंड, यूट्यूब-गुगलवरही कडक कारवाई

राजकीय कंटेंट दिसेल पण.. 

या निर्णयानुसार कंपनी आता डिफॉल्ट स्वरुपात युजर्ससाठी राजकीय कंटेंट प्रमोट करणार नाही. पण, युजर फॉलो करत असलेल्या एखाद्या अकाउंटवरून राजकीय पोस्ट झाल्यास तो मजकूर मात्र त्यांना नक्कीच दिसणार आहे.

नेमकं काय होणार ?

इन्स्टाग्राम आणि थ्रेड्स युजर्सचा वापर, त्यांच्याकडून लाईक केल्या जात असलेल्या पोस्ट आणि अन्य माहिती विचारात घेऊन त्यानुसार त्यांनी कंटेंट सजेस्ट केला जातो. त्यामुळे बऱ्याचदा युजर्सना अशा पोस्टही दिसतात ज्यांना त्यांनी फॉलो केलेले नसते. यामध्ये राजकीय कंटेंटही दिसत असायचा. आता मात्र याच राजकीय कंटेंटला कंपनी प्रोत्साहन देणार नाही. याचाच अर्थ वापरकर्त्यांना हा कंटेंट कंपनी स्वतःहून सजेस्ट करणार नाही आणि हा कंटेंट त्यांना दिसणारही नाही.

मार्क झुकरबर्गला युरोपियन युनियनचा झटका ! युझर्सचा डेटा विकल्याप्रकरणी ठोठावला मोठा दंड

पुढील काही दिवसांत हा निर्णय लागू होईल. तसेच आगामी काळात इन्स्टाग्रामवरील रील एक्सप्लोअरमधून पॉलिटिकल कंटेंट काढून टाकण्यासाठी अन्य मार्गांचा वापर केला जाईल, अशी माहिती मोसेरी यांनी दिली.

पॉलिटिकल कंटेंटसाठी नवे फीचर 

ज्या वापरकर्त्यांना राजकीय कंटेंटची आवड असेल त्यांच्यासाठी कंपनीने नवीन फीचर लाँच केले आहे. कंट्रोल फीचर असे नाव आहे. यामध्ये सजेस्टेड कंटेंट टॅबमध्ये नॅव्हिगेट करून पॉलिटिकल कंटेंट हा पर्याय निवडता येऊ शकेल. यानंतर वापरकर्त्यांना त्यांच्या टाईमलाईनवर राजकीय कंटेंट, पोस्ट दिसू लागतील.

follow us