Download App

गणित मायनस नाही प्लस झालंय! रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलताना माढा लोकसभा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केलं.

Ranjit Singh Naik Nimbalkar Interview : माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारही खासदर राहिले आहेत. त्यांनी निडणुकीच्या अगोदर अनेक अश्वासनं दिले होते. परंतु, निवडून आल्यानंतर ते दिलेले आश्वासन विसरले असा थेट आरोप माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. ते लेट्सअप मराठीच्या ‘लेट्सअप चर्चा‘ यामध्ये बोलत होते.

 

गणित मायनस नाही प्लस झालं

गेल्यावेळी सोबत असणारे मोहिते पाटील, उत्तमराव जानकर यावेळी आपल्या विरोधात आहेत. त्यामुळे माळशिरसचं मायनस झालेलं गणित आपण प्लसमध्ये कसं आणणार या प्रश्नावर रणजितसिंह निंबाळकर यांनी असा काही फरक पडणार नाही असं सांगितलं. तसंच, गेल्यावेळी माझ्या विरोधात उभे असलेले संजय मामा शिंदे यांनी यावेळा मला पाठिंबा दिलाय. गेल्यावेळी त्यांना माझ्याविरोधात पाच लाखापेक्षा जास्त मत होती. तसंच, रश्मी बागल, माळशिरसचे आमदार बबन शिंदे, दिपक आबा साळुंखे यांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे मायनस नाही तर गणित प्लस झालं आहे असंही रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळी म्हणाले.

 

ते विरोधात असो किंवा सोबत काही फक पडत नाही

तुमच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर, मोहिते पाटील, उत्तमराव जाणकर यांचा विरोध होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, तुम्ही त्या बैठकीला गेला नाहीत या प्रश्नावर रणजितसिंह म्हणाले, रामराजे निंबाळकर कालही माझ्या विरोधात होत आणि आजही ते माझ्या विरोधात आहेत. त्यामुळे ते सोबत असो किंवा विरोधात मला काही फरक पडत नाही असं थेट स्पष्टीकरण रणजितसिंह यांनी यावेळी दिलं. तसंच, मोहित पाटलांना सर्व पद आपल्याच घरात पाहीजेत. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही असंही ते यावेळी म्हणाले.

follow us